मे महिना या एकाच राशीचा! कडक उन्हात थंडी वाजेल, तुमच्यावर पैशांचा मोठा पाऊस पडेल
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
गुरूवार जसा शुभ वार मानला जातो, तसाच गुरू ग्रह अत्यंत शुभ असतो असं ज्योतिषशास्त्र सांगतंं. या ग्रहाचा जेव्हा राशीप्रवेश होतो, तेव्हा त्या राशीच्या व्यक्तींचं नशीब अक्षरश: उजळून निघतं. आधी कधीच अनुभवलं नसेल एवढं ऐश्वर्य त्यांच्या वाट्याला येतं. शिवाय गुरू ग्रहाचा ज्या इतर राशींवर सकारात्मक प्रभाव पडतो, त्या राशींच्या व्यक्तींनाही सुखद काळ अनुभवायला मिळतो. येत्या मे महिन्यात गुरू ग्रहाचा राशीप्रवेश होतोय. त्यामुळे तयारीला लागा. (राहुल मनोहर, प्रतिनिधी / सीकर)
advertisement
advertisement
advertisement
गुरू ग्रहाला ज्ञान आणि प्रगतीचा कारक मानलं जातं. तो सध्या मंगळ ग्रहाच्या मेष राशीत विराजमान आहे. जेव्हा त्याचा वृषभप्रवेश होईल तेव्हा या राशीच्या व्यक्तींना हाती घेतील त्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना नवनव्या गोष्टी शिकायला मिळतील. विशेष म्हणजे या राशीच्या व्यक्तींचं आरोग्य उत्तम साथ देईल. आर्थिक स्थिती अगदी मनासारखी असेल, पैशांचा जणू पाऊस पडेल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)