Richest Temples in India : भारतातील या 10 मंदिरात लाखो-कोट्यवधींचा 'खजिना'; महाराष्ट्रातीलही 2 देवस्थानं
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
देशातील 10 श्रीमंत मंदिरांची यादी.
advertisement
देशातल्या सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत पद्मनाभस्वामी मंदिर पहिल्या क्रमांकावर आहे. हे मंदिर दक्षिण भारतातल्या केरळ राज्याच्या राजधानीच्या म्हणजेच तिरुवनंतपुरम शहरात आहे. 2011मध्ये या मंदिराचे 6 दरवाजे उघडले आणि त्यातून सोनं, हिरे आणि मौल्यवान रत्नं सापडली. त्यांची किंमत अंदाजे 20 अब्ज डॉलर्स आहे. या मंदिराची देखभाल त्रावणकोर राजघराण्याकडून केली जाते. या मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान विष्णूची सोन्याची मूर्ती आहे. जिची किंमत 500 कोटींहून अधिक आहे.
advertisement
advertisement
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतलं श्री सिद्धिविनायक मंदिर हे देशातल्या सर्वांत प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. दर वर्षी लाखो भाविक आणि विविध सेलेब्रिटी या मंदिराला भेट देतात. या मंदिरात 3.7 किलो सोन्याचं कोटिंग कोलकात्यातल्या एका व्यावसायिकाने दान केलं आहे. या मंदिरात दर वर्षी सुमारे 125 कोटींचं दान येतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गुजरातमधलं सोमनाथ मंदिर हे भगवान शंकराचं आहे. ते देशातल्या सर्वांत श्रीमंत मंदिरांपैकी एक असून, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महमूद गझनीने या मंदिरावर 17 वेळा हल्ला करून ते लुटण्याचा प्रयत्न केला. गझनीच्या आक्रमणाच्या वेळी या मंदिराच्या पायऱ्याही सोन्याच्या होत्या असं म्हणतात. इथे दर वर्षी कोट्यवधींचं दान येतं.
advertisement
advertisement