अंबाबाई मंदिरात केला जातो काकडा प्रज्वलित; तुम्हाला माहिती आहे का ‘ही’ परंपरा?
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
अंबाबाई मंदिरात काकडा प्रज्वलित करण्याची परंपरा आहे. ही परंपरा नेमकी काय आहे? पाहा
दरवर्षी दिवाळीच्या पहिला दिवसापासून करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरातील नित्योपचारात बदल होतो. हा बदल पुढे येणाऱ्या पोर्णिमेपर्यंत 15 दिवस होत असतो. त्यामागचे कारण म्हणजे काकडा प्रज्वलित करण्याची परंपरा. ही परंपरा नेमकी काय आहे ? का ही परंपरा जपली गेली आहे, याबाबत बहुदा बऱ्याच जणांना ठाऊक नाही आहे.
advertisement
advertisement
या काळात सुताचा, वातींचा आणि कापुराचा एकत्र केलेला जुडगा एका भांड्यात लावला जातो. यालाच काकडा असे म्हटले जाते. हा काकडा प्रज्वलित करून मंदिरातील मुख्य शिखरावर पश्चिमेकडे सर्वात उंचावर ठेवला जातो. त्यानंतर मशालीच्या साहाय्याने रोशन नाईक मंदिर परिसरातील इतर सर्व देवतांपुढे हा काकडा फिरवून कापूर लावला जावतात. त्यानंतरच मंदिराचे मुख्य गर्भगृह उघडले जाऊन देवीची काकडआरती होत असते.
advertisement
खरंतर कार्तिक मासात सर्वत्र दिवे लावण्याचा प्रघात आहे. त्यामध्ये आकाश दिपदानाचीही एक धार्मिक परंपरा आहे. त्यामुळेच आकाशाला दिवा समर्पित करण्यासाठी हा काकडा ठेवला जाण्याची ही परंपरा होय. कारण मंदिर शास्राप्रमाणे त्याबरोबरच जुन्या नगर शास्त्राप्रमाणे गावातील सर्वात उंच स्थान म्हणजे मंदिराचे शिखरच असायचे. तसेच त्या ठिकाणी देवतेचा वास असतो, अशा भावनेतूनच हा काकडा प्रज्वलित करण्याची परंपरा पार पाडली जात असावी, अशी माहिती मंदिर अभ्यासक ॲड. प्रसन्न मालेकर यांनी दिली आहे.
advertisement
मंदिराचे गर्भगृह उघडण्याआधी पहाटे साधारण 2 वाजता हा काकडा यावेळी देखील अनेक भाविक भक्तिभावाने आणलेला कापूर या काकड्यामध्ये समर्पित करत असतात. मंदिरातील घंटेचा निनाद आणि शहनाईच्या मधुर सुरांच्या साथीने हा काकडा शिखरावर नेऊन प्रज्वलीत केला जातो. पुढे हा प्रज्वलित केलेला काकडा एका हातात धरून, मुख्य शिखराकडे पाठ करून वर चढवला जातो.
advertisement