पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगणार त्रिशुंड गणपती मंदिर; तुम्हाला माहितीये का इतिहास ?
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
पुण्यात अनेक प्राचीन मंदिर पाहायला मिळतात. त्या पैकीच त्रिशुंड गणेश मंदिर देखील एक अपरिचित पण ऐतिहासिक वारसा लाभलेलं मंदिर आहे.
पुणे शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहरात अनेक भागात प्राचीन मंदिर पाहायला मिळतात. ग्रामदैवत कसबा गणपती, सारसबाग, चतु:श्रृंगी ही मंदिर प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी भाविकांची नेहमी गर्दी पाहिला मिळते. त्याचबरोबर त्रिशुंड गणेश मंदिर देखील एक अपरिचित पण ऐतिहासिक वारसा लाभलेलं मंदिर आहे. 1754 च्या दरम्यान हे मंदिर बांधण्यात आले होते.
advertisement
पुण्यातील सोमवार पेठेत त्रिशुंड गणपती मंदिर आहे. पुण्यातील सर्व गणपती मंदिरांमधले शिल्पकलेने नटलेले हे सर्वोत्तम मंदिर असल्याचं मानलं जातं. इ.स. 1600 मध्ये शहापुरा ही पेठ शहाजीराजांनी वसवली. त्यानंतर 1735 मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी या पेठेत व्यापाराला चालना दिली. त्याचे सोमवार पेठ असं नामकरण केलं. तेव्हा या पेठेत गोसावी समाजाची मोठी वस्ती होती.
advertisement
दगडी कोरीव शिल्पांनी नटलेले त्रिशुंड गणपतीचे मंदिर कसबा पेठेतून मंगळवार पेठ दवाखान्याच्या दिशेने जकातेपुला नंतर, उजव्या बाजूस आहे, त्रिशुंड गणेशाची मूर्ती महाराष्ट्रात क्वचितच आढळते. या मंदिराच्या निर्मितीमागे शिवमंदिराची कल्पना असल्यामुळे या मंदिराची शैली शिवमंदिराप्रमाणे आहे. कालमानानुसार या मंदिराच्या स्वरुपात थोडा बदल झाला आहे.
advertisement
advertisement
या मंदिरातील गर्भगृहाच्या चौकटीवर दोन संस्कृत आणि एक फारशी शिलालेख आहेत. पहिल्या संस्कृत शिलालेखात मंदिराच्या बांधकामाचा काळ आणि रामेश्वराची (श्री शंकर) प्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख असून दुसऱ्या शिलालेखात गीतेतील आरंभीचा नमनाचा श्लोक कोरलेला आहे, तर फारशी शिलालेखात हे स्थान गुरुदेवदत्तांचे असल्याचं स्पष्ट केलंय.
advertisement