advertisement

मंत्री जयकुमार गोरे यांच्या एका डोळ्यात आसू-एका डोळ्यात हसू, भाऊ हरला-वहिनी जिंकली!

Last Updated:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकवर्तीय नेते, राज्य सरकारमधील सहकारी मंत्री जयकुमार गोरे यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला. त्यांच्या बंधूंना पराभवाला सामोरे जावे लागले.

जयकुमार गोरे
जयकुमार गोरे
सातारा : राज्यातील १२ जिल्हा परिषदांसाठी आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांसाठी यंदा निवडणूक प्रक्रिया राबवली गेली. शनिवारी मतदान संपन्न झाले तर आज सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. साताऱ्यातल्या जिल्हा परिषद निवडणूक निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकवर्तीय नेते, राज्य सरकारमधील सहकारी मंत्री जयकुमार गोरे यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला.

जयकुमार गोरे यांचा भाऊ हरला

जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे यांचा माण तालुक्यातील कुकडवाड गटात धक्कादायकरित्या पराभव झाला. त्यांच्या पराभवाने जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसला. अरुण गोरे यांना निवडून आणण्यासाठी जयकुमार गोरे यांनी मोठी ताकद लावली. पण मतदारांनी अरुण गोरे यांना नाकारले.
advertisement

जयकुमार गोरे यांची वहिनी विजयी

दुसरीकडे औंध जिल्हा परिषद गटातून जयकुमार गोरे यांच्या वहिनी भारती गोरे यांनी विजय मिळवला. राष्ट्रवादीच्या मनिषा फडतरे यांचा भारती गोरे यांनी पराभव केला. आधी
राष्ट्रवादीच्या मनिषा फडतरे या 40 मतांनी जिंकल्या अशी घोषणा करण्यात आली. परंतु फेरमतमोजणीत भारती गोरे यांनी विजय मिळवला.

मंत्री जयकुमार गोरे यांच्या एका डोळ्यात हसू एका डोळ्यात आसू

advertisement
जयकुमार गोरे यांनी बंधू आणि वहिनींसाठी मोठी ताकद पणाला लावली, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना कामाला लावले. मात्र मतदारांनी अरुण गोरे यांना नाकारून भारती गोरे यांना साथ दिली. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी 'कहीं खुशी कही गम' अशी जयकुमार गोरे यांची अवस्था होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मंत्री जयकुमार गोरे यांच्या एका डोळ्यात आसू-एका डोळ्यात हसू, भाऊ हरला-वहिनी जिंकली!
Next Article
advertisement
अजितदादांचा उमेदवार ठरला 'जायंट किलर', दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव; कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ, संपूर्ण राज्यात चर्चा
Kolhapur ZP: अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर, दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव
  • अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर

  • जिल्हा परिषद निकालांनी नवं गणित

  • कोल्हापूरमधील निकालांने धक्का

View All
advertisement