advertisement

India vs Pakistan : 'उपकार विसरू नका, आम्ही तुम्हाला...', बोर्डाने पाकिस्तानला आरसा दाखवला, माघारीसाठी दबाव आणखी वाढला

Last Updated:

आयसीसी टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे हा सामना होणार की नाही? हा मोठा प्रश्न आहे. या संदर्भात रविवारी लाहोरच्या स्टेडियमवर पाकिस्तान बोर्ड, बांग्लादेश बोर्ड आणि आयसीसीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती.

India vs Pakistan Match
India vs Pakistan Match
India vs Pakistan Match : आयसीसी टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे हा सामना होणार की नाही? हा मोठा प्रश्न आहे. या संदर्भात रविवारी लाहोरच्या स्टेडियमवर पाकिस्तान बोर्ड, बांग्लादेश बोर्ड आणि आयसीसीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. पण या चर्चेवर तोडगा काढण्याऐवजी पाकिस्तानने नवीन थोतांड बाहेर काढले होते.त्यामुळेच सगळेच संतापले आहेत. या सगळ्या घडामोडी सूरू असताना UAE च्या इमिरेटस क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानला इेमल केला आहे. हा ईमेल करून इमिरेटस पाकिस्तानवर दबाव टाकला आहे आणि उपकार विसरू नका असा इशाराही दिला आहे.
खरं तर पाकिस्तान बहिष्काराच्या भूमिकेवर दररोज नवीन नाटक करत असल्याने UAE च्या इमिरेटस क्रिकेट बोर्डाने संतापून पाकिस्तानला ईमेल केला आहे. रेव्हस्पोर्टच्या वृत्तानुसार, एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने आपल्या पत्रात पाकिस्तानचा "क्रिकेट कुटुंबातील एक मौल्यवान सदस्य" म्हणून उल्लेख केला आहे. तसेच त्यांनी कठीण काळात पाकिस्तानला त्यांचे मैदान उपलब्ध करून दिले आहे आणि अनेक आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास मदत केली आहे. बोर्डाने हे देखील आठवण करून दिली की जागतिक स्तरावर पाकिस्तान क्रिकेट राखण्यात युएईने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. म्हणूनच, भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकणे केवळ क्रिकेटसाठी हानिकारक नाही तर सहयोगी देशांच्या आर्थिक परिस्थितीवर देखील नकारात्मक परिणाम करू शकते.
advertisement
तसेच टी20 वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत कोणताही मोठा सामना रद्द केल्याने थेट प्रसारण हक्क, प्रायोजकत्व आणि जागतिक प्रेक्षकांवर परिणाम होतो, ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट परिसंस्थेला हानी पोहोचण्याची शक्यता असते. म्हणून, सर्व पक्षांनी एकत्रितपणे व्यावहारिक आणि स्वीकारार्ह उपाय शोधण्यासाठी काम केले पाहिजे. त्यामुळे उपकार विसरू नका अशी युएईच्या इमिरेटस बोर्डाने पाकिस्तानला आठवण करून देत, लवकरात लवकर बहिष्काराच्या भुमिकेवर माघार घ्यावी यासाठी दबाव टाकला आहे.
advertisement
रविवारच्या बैठकीत काय तोडगा निघाला?
लाहोरच्या गडाफी स्टेडियममध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, आयसीसी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात रविवारी बैठक पार पडली होती.या बैठकीमध्ये भारताविरुद्धचा सामना खेळण्यासाठी पाकिस्तान 3 मागण्या ठेवल्या होत्या. ज्यामध्ये आयसीसीकडून प्रत्येक देशाच्या बोर्डाला महसूल दिला जातो, या महसुलामध्ये वाढ करावी, अशी पहिली मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बैठकीत केली होती. तसेच मागच्या काही वर्षांपासून भारत-पाकिस्तान यांच्यात आयसीसी स्पर्धा वगळता सीरिज होत नाहीयेत, त्यामुळे या दोन्ही सीरिज सुरू व्हाव्यात, अशी दुसरी मागणी पाकिस्तानकडून केली गेली. पाकिस्तानने ही मागणी केली, तरीही ही मागणी आयसीसीच्या अखत्यारीत येत नाही.
advertisement
आशिया कपमध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. टी-20 वर्ल्ड कपचा सामना खेळायचा असेल, तर दोन्ही देशाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करावं, अशी अटही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ठेवली होतीह.या बैठकीत पाकिस्तानकडून मोहसिन नक्वी, आयसीसीकडून इम्रान ख्वाजा आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून अमिनुल इस्लाम बुलबुल सहभागी झाले होते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
India vs Pakistan : 'उपकार विसरू नका, आम्ही तुम्हाला...', बोर्डाने पाकिस्तानला आरसा दाखवला, माघारीसाठी दबाव आणखी वाढला
Next Article
advertisement
अजितदादांचा उमेदवार ठरला 'जायंट किलर', दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव; कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ, संपूर्ण राज्यात चर्चा
Kolhapur ZP: अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर, दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव
  • अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर

  • जिल्हा परिषद निकालांनी नवं गणित

  • कोल्हापूरमधील निकालांने धक्का

View All
advertisement