Sangli Panchayat Samiti Result : सांगली जिल्ह्यातील पंचायत समितीत कुणी मारली बाजी? पाहा तालुका वाईज संपूर्ण निकाल
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sangli Panchayat Samiti Election Result : सांगली पंचायत समिती निवडणुकीत काही तालुक्यांत सत्ताधाऱ्यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे, तर काही ठिकाणी महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.
Sangli Panchayat Samiti Election Result 2026 : सांगली जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकीचे सर्व निकाल आता हाती आले असून, जिल्ह्याच्या ग्रामीण सत्तेचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत काही तालुक्यांत सत्ताधाऱ्यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे, तर काही ठिकाणी महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. मिरज आणि जत तालुक्यामध्ये भाजपने आपली पकड मजबूत ठेवली आहे. मिरज पंचायत समितीच्या 22 जागांपैकी 10 जागांवर विजय मिळवत भाजपने मोठे यश संपादन केले आहे, तर जतमध्ये 18 पैकी 12 जागा जिंकून एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जतमध्ये काँग्रेसला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले असून, तिथे कमळाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले आहे.
वाळवा तालुक्यात मात्र चित्र पूर्णपणे वेगळे असून तिथे आमदार जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाने 22 पैकी 14 जागा जिंकून विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. येथे भाजपने केवळ 4 जागा मिळवल्या असून, सत्तेचा रिमोट पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे गेला आहे. खानापूरमध्ये आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाने 8 पैकी 8 जागा जिंकून ऐतिहासिक 'क्लीन स्वीप' दिला आहे.
advertisement
कडेगाव तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, तिथे 8 पैकी 7 जागा जिंकून त्यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. तासगावमध्ये मात्र दोन राष्ट्रवादी गटांमध्ये चुरस पाहायला मिळाली, ज्यात अजित पवार गटाने 4 जागा जिंकून सरशी घेतली आहे. शिराळ्यात चुरशीची लढत झाली असून तिथे राष्ट्रवादी अजित पवार गटाने 3 जागा जिंकल्या आहेत, तर एका अपक्ष उमेदवाराने देखील बाजी मारली आहे.
advertisement
| तालुका | एकूण गण | BJP | राष्ट्रवादी (अजित पवार) | शिवसेना (शिंदे) | काँग्रेस | राष्ट्रवादी (शरद पवार) | इतर/अपक्ष |
| मिरज | 22 | 10 | 3 | 2 | 3 | 4 | 0 |
| वाळवा | 22 | 4 | 0 | 4 | 0 | 14 | 0 |
| जत | 18 | 12 | 2 | 0 | 4 | 0 | 0 |
| शिराळा | 8 | 2 | 3 | 0 | 0 | 2 | 1 |
| कडेगाव | 8 | 1 | 0 | 0 | 7 | 0 | 0 |
| तासगाव | 6 | 0 | 4 | 0 | 0 | 2 | 0 |
| खानापूर | 8 | 0 | 0 | 8 | 0 | 0 | 0 |
advertisement
| कवठेमहांकाळ | 00 | 00 | 03 | 00 | 00 | 05 | 00 |
| आटपाडी | 00 | 03 | 00 | 05 | 00 | 00 | 00 |
| पलूस | 00 | 01 | 00 | 00 | 07 | 00 | 00 |
दरम्यान, एकूणच सांगलीच्या मिनी मंत्रालयात यावेळी संमिश्र यश पाहायला मिळत आहे. जिल्ह्याच्या काही भागांत महायुतीचे वर्चस्व आहे, तर काही तालुके महाविकास आघाडीच्या ताब्यात गेले आहेत. या निकालांमुळे आगामी काळातील जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा निश्चित होणार असून, विजयी उमेदवारांनी आता गुलालाची उधळण करत विजयाचा जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 3:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sangli Panchayat Samiti Result : सांगली जिल्ह्यातील पंचायत समितीत कुणी मारली बाजी? पाहा तालुका वाईज संपूर्ण निकाल










