Ravan : रावण कोणाचा अवतार होता? दसऱ्याला राक्षस म्हणून दहन करतो, पण ही गोष्ट अनेकांना माहितच नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आपल्याला माहीतच आहे, भगवान राम हे विष्णूंचे अवतार आहेत आणि माता सीता या लक्ष्मीच्या अवतार मानल्या जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की रावण आणि कुंभकर्ण यांचं खरं रहस्य काय आहे? ते फक्त राक्षस होते का? की त्यामागे अजून काही गूढ कथा दडलेली आहे?
advertisement
advertisement
advertisement
पुराणांनुसार, वैकुंठात भगवान विष्णूंचे दोन द्वारपाल होते. ज्यांची नावं होती जय आणि विजय. हे दोघं अतिशय पराक्रमी आणि बलशाली होते. एकदा काही ऋषींनी वैकुंठात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण जय-विजयांनी त्यांना थांबवलं. यामुळे ते ऋषी संतापले आणि त्यांनी जय-विजयांना शाप दिला की, तुम्हाला मर्त्यूलोकात जन्म घ्यावा लागेल आणि पृथ्वीवर राक्षस म्हणून यावं लागेल.
advertisement
हा शाप ऐकून जय-विजय व्याकूळ झाले. ते भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांनी क्षमा मागितली. त्यांनी विष्णूला हे देखील सांगितलं की आम्ही आमच्या कर्तव्याचं पालन केलं, त्यामुळे आम्हाला माफी मिळावी. त्यावेळी भगवान विष्णूंनी सांगितलं, “तुम्हाला पृथ्वीवर तीन जन्म घ्यावे लागतील. पण त्या प्रत्येक जन्मात माझ्याशी तुमचं युद्ध होईल आणि तुम्हाला माझ्या हातून पराभूत व्हावं लागेल.” त्यावेळी भगवान विष्णूकडून आपल्याला मृत्यू प्राप्त होईल हे ऐकल्यावर आपलं आयुष्य धन्य झालं असं जय-विजय यांनी मान्य केलं आणि हसत हसत तो श्राप स्वीकारला.
advertisement
advertisement
दुसरा जन्म - रावण आणि कुंभकर्णयानंतर दुसऱ्या जन्मात हेच जय-विजय रावण आणि कुंभकर्ण म्हणून जन्माला आले. रावण विद्वान, पराक्रमी आणि महाशक्तिशाली होता, तर कुंभकर्ण अतुलनीय बलाढ्य. पण त्यांच्या अहंकारामुळे आणि कर्मामुळे त्यांचा विनाश निश्चित झाला. भगवान विष्णूंनी रामावतार घेऊन या दोघांचा पराभव केला.
advertisement
advertisement
advertisement