IND vs NZ : विराट-रोहितची जागा फिक्स, पण... वर्षाच्या पहिल्याच सीरिजमध्ये 5 जणांची टीम इंडियातून हकालपट्टी!

Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या वनडे सीरिजला 11 जानेवारीपासून सुरूवात होत आहे. वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची निवड 3 जानेवारीला होणार आहे. भारतीय टीममध्ये 5 खेळाडूंचं कमबॅक होण्याची शक्यता आहे.
1/5
शुभमन गिल मानेच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये गिलच्या मानेला दुखापत झाली होती, त्यानंतर गिल मैदानापासून लांब आहे. भारताच्या वनडे टीमचा कर्णधार असलेला गिल न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये कमबॅक करेल.

advertisement
2/5
फास्ट बॉलर मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक क्रिकेटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. मोहम्मद शमीने शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच 9 मार्च 2025 ला न्यूझीलंडविरुद्धच चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खेळली. वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या शमीने 108 सामन्यांमध्ये 206 बळी घेतले आहेत.

3/5
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजवेळी टीम इंडियातून बाहेर गेलेला अक्षर पटेल न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये कमबॅक करण्याची शक्यता आहे. अक्षर पटेल टीम इंडियात वॉशिंग्टन सुंदरची जागा घेऊ शकतो.

4/5
दोन वर्षांपासून जास्त काळ टीम बाहेर असलेल्या इशान किशनलाही वनडे सीरिजसाठी संधी मिळू शकते. इशान किशनने शेवटची वनडे 11 ऑक्टोबर 2023 ला दिल्लीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळली होती.

5/5
न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये बुमराहला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे मोहम्मद सिराजचीही टीममध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे. सिराजने शेवटची वनडे ऑक्टोबर 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली.

Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement