Success Story: मनगटावरच्या टॅटूनं मिळालं बळ, 10 सेकंदात पलटली बाजी, खुशबूनं सांगितली गोल्ड मेडलमागची कहाणी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
९५ अंगाला मार लागला होता, प्रचंड वेदना होत होत्या, असं वाटलं आता सगळं संपलं, मात्र मनगटावरच्या टॅटूनं सारा खेळ बदलला, शेवटच्या 10 सेकंदात जे घडलं ते खुशबू कधीच विसरू शकणार नाही.
advertisement
advertisement
advertisement
खुशबू थोडी थांबली, डोळे पाणावले. तिने सांगितलं की अंतिम सामन्याच्या शेवटच्या क्षणी तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने तिला जवळपास 95 टक्के पराभूत केलं होतं. शरीर साथ सोडत होतं, मनही खचलं होतं. तेव्हाच अचानक तिची नजर स्वतःच्या मनगटावर गेली. त्या मनगटावर तिच्या वडिलांचं नाव कोरलेलं होतं. त्या एका नजरेनं तिला नवा जोश मिळाला. नाव वाचताच हिम्मत, ऊर्जा आणि जोश मिळाला.
advertisement
फक्त दहा सेकंद शिल्लक होते. त्या काही सेकंदांत सामना पूर्णपणे पलटला. खुशबू उभी राहिली, झपाट्यानं पुढे गेली आणि शेवटच्या पाच सेकंदांत प्रतिस्पर्धी खेळाडूच्या पाठीवर येत तिला चोक केलं. सामना संपला आणि निकाल तिच्या बाजूने लागला. ती जिंकली होती. पण ती सांगते, ''दहा मिनिटांपर्यंत मला विश्वासच बसत नव्हता की मी देशासाठी सुवर्णपदक जिंकलं आहे. सगळं काही त्या शेवटच्या दहा सेकंदांत घडलं.''
advertisement
खुशबूचा हा प्रवास अचानक सुरू झालेला नव्हता. लहानपणापासूनच तिला फाइटिंगची आवड होती. ती स्वतःला नेहमी मुलांसारखी समजायची आणि त्यांच्यासोबत बॉक्सिंग करायची. तिचा भाऊ जूडो करत होता. त्याच्याकडून प्रेरणा घेत तिने सातवीपासून जूडो सुरू केलं. वडीलही कुस्ती खेळायचे. ती म्हणते, “पप्पांचा जो रक्त आहे, तो माझ्यात जास्त होता.”
advertisement
advertisement
''पप्पानी कधीच मला मुलगी आहे असं वाटू दिलं नाही,'' खुशबू सांगते, ''ते कायम म्हणायचे तू चांगलं कर, तुझा बाप तुझ्यासोबत आहे. लोक काहीही बोलतात, तू फक्त तुझ्या ध्येयाकडे बघ.'' मागच्या वेळी एशियन आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक हुकल्यानं यावेळी तिच्यावर प्रचंड दबाव होता. ती वारंवार घरी फोन करून मनातली भीती सांगायची. वडिलांनी तिला धीर दिला. आज त्या शब्दांचाच आधार घेऊन तिने हे सुवर्णपदक जिंकलं.








