Israel Attacks Iran : एकीकडे पुण्याची 84 जणं दुबईत अडकली, दुसरीकडं इस्रायल इराण युद्धाचा पुणेकरांना मोठा फटका!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Israel Attacks Iran Effect on Pune : इराण आणि इस्रायल या देशांमधील वाद पेटला असताना आता पुणेकरांना देखील या युद्धाचा फटका बसल्याचं पहायला मिळतोय.
Israel Iran War News : इराण आणि इस्रायल यांच्यातील घनघोर युद्घाला सुरूवात झाली आहे. काल रात्री इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अशातच युद्ध आणखीच भडकण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील वाद पेटला असताना आता पुणेकरांना देखील या युद्धाचा फटका बसल्याचं पहायला मिळतोय.
मुंबई विमानतळावर शेकडो प्रवाशांना त्रास
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या तणावामुळे भारतीय विमानसेवेला मोठा फटका बसला आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम मुंबई विमानतळावरून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर झाला असून, शेकडो प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पश्चिम आशियातील बिघडलेल्या सुरक्षेच्या कारणास्तव अनेक विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे पुण्यातील उड्डाणे देखील रखडली आहेत.
advertisement
पुणे विमानतळावरून रद्द करण्यात आलेली विमाने:
SG 51 – पुणे ते दुबई (निर्गमन: 20:30 वाजता)
SG 52 – दुबई ते पुणे (आगमन: 04:55 वाजता, 02/03/2026)
6E 1484/1483 – दुबई–पुणे–दुबई (आगमन: 22:30 वाजता | निर्गमन: 00:30 वाजता, 02/03/2026)
युद्धाचा पुण्यातील हवाई वाहतुकीला फटका बसला आहे. पुण्यातून जाणारे अनेक विमाने रद्द झाली आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून दुबई आणि अबु धाबीला जाणारी अनेक विमानं रद्द करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे पुण्यातील नामांकित विद्यालयाचे 84 जणं दुबईमध्ये अडकले आहेत. यामध्ये 80 विद्यार्थी आणि 4 शिक्षकांचा समावेश आहेत. हे सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती मिळतीये.
advertisement
भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाकडून पुण्यातील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. नामांकित विद्यालयाचे विद्यार्थी "स्टडी व्हिसिट" साठी दुबई येथे गेले होते. कृपया कोणी ही घाबरून जाऊ नये, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशात आणले जाणार, असं आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात येत आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून सुद्धा विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 01, 2026 1:09 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Israel Attacks Iran : एकीकडे पुण्याची 84 जणं दुबईत अडकली, दुसरीकडं इस्रायल इराण युद्धाचा पुणेकरांना मोठा फटका!










