Apple Event 2024: आयफोन 16 चा जबरदस्त लूक आला समोर! फीचर्सही भारी, किंमत किती?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
iphone 16 सीरीज अखेर लॉन्च झाली आहे. आयफोन 16 सोबत apple ने 5 प्रोडक्टची लॉन्चिंगही केलीये.
advertisement
advertisement
advertisement
ॲपलने या मेगा टॅग इव्हेंटला ग्लोटाइम असं नाव दिलं आहे. या इव्हेंटमध्ये युजर्ससाठी नव्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अॅपलने पहिल्यांदाच आपल्या आयफोनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI वापर केला आहे. Apple Intelligence बीटामध्ये येत आहे. Apple चे AI किमान आत्तासाठी वापरण्यासाठी विनामूल्य असणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
किंमत किती? : आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स या सीरिजमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. आयफोन 16 ची किंमत ही 799 डॉलर असणार आहे. भारतीय चलनामध्ये याची किंमत ही 67 हजार असणार आहे. तर सर्वात महागडा आयफोन यंदा हा 1599 डॉलर म्हणजे भारतीय चलनामध्ये एक लाख 34 हजार असणार आहे. भारतात हा फोन पुढील महिन्याच्या अखेरीस दाखल होईल, तेव्हा किंमतीत फरक असणार आहे.
advertisement
advertisement
Apple Watch Series 10 ला डिटेक्शन फीचर, S10 चिपसेटचा सपोर्ट मिळेल सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी वॉच अल्ट्रामध्ये स्लीप एपनिया डिटेक्शन फीचर दिले होते, आता ॲपलनेही आपल्या नवीन स्मार्टवॉचमध्ये ही सुविधा दिली आहे. कंपनीने नवीन स्मार्टवॉचमध्ये नवीन S10 चिपसेट दिला आहे. या चिपसेटमध्ये अनेक एआय फीचर्स देखील जोडण्यात आले आहेत. तुम्ही घड्याळावर डबल टॅप करून क्रॅश डिटेक्शन वैशिष्ट्य वापरण्यास सक्षम असाल. यामध्ये फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे. तुम्ही ते फक्त अर्ध्या तासात चार्ज करू शकाल.