एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, मध्यरात्री सारं जमिनदोस्त... 622 जणांचा मृत्यू, भूकंपाने हादरलं अफगाणिस्तान, PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अफगाणिस्तानच्या हिंदूकुश प्रदेशात 6 रिश्टरपेक्षा तीव्र भूकंप, 622 मृत, दीड हजार जखमी, नुरगल आणि आसपासच्या गावांमध्ये मोठं नुकसान, रेस्क्यू ऑपरेशन सुरू.
आपल्या लोकांना शोधण्यासाठी प्रचंड आक्रोश, चेहऱ्यावर भीती, आपलं माणूस शोधण्यासाठी धडपड, मध्यरात्री आभाळ कोसळावं तसं घराचं क्षण एका क्षणात खाली आलं. भिंती जमीनदोस्त झाल्या आणि होत्याचं नव्हतं झालं. गोंधळ, आरडा-ओरड आणि प्रचंड आक्रोश परिसरात पसरला होता. काही कळण्याआत अख्खं गावच्या गाव जमीनदोस्त झालं होतं.
advertisement
advertisement
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 622 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठी जीवितहानी झाली. इतकंच नाही तर दीड हजारहून अधिक लोक जखमी असून त्यांना तातडीनं उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पोहोचवण्यात आलं आहे. आजूबाजूच्या भागात जशी ही बातमी पसरली तसे लोक मदतीला धावले पण तोपर्यंत उशीर झाला होता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


