Snake romance - साप कसा करतात रोमान्स? इतर प्राण्यांपेक्षा खूप वेगळा असतो त्यांचा प्रणय

Last Updated:
पुराणकथा आणि दंतकथांमध्ये सापांच्या प्रेमकथा देखील प्रसिद्ध आहेत. सापांच्या प्रणयक्रियेचे असे अनेक पैलू आहेत ज्याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे.
1/7
पृथ्वीवर सापांच्या सुमारे तीन हजार प्रजाती आहेत. पुनरुत्पादन प्रक्रिया म्हणजे सापांचा प्रणय बहुतेक प्राण्यांसारखाच दिसतो; पण त्यातल्या काही गोष्टी रोमांचक किंवा आश्चर्यकारक आहेत. काही साप तर असेही आहेत, जे अलैंगिकपणे प्रजनन क्रिया पार पाडतात. याउलट, लैंगिक पुनरुत्पादनात प्रणय आणि संभोग यांची महत्त्वाची भूमिका असते.

advertisement
2/7
सापांबद्दल असं म्हटलं जातं, की ते विशिष्ट कालवधीमध्येच प्रणय करतात. सामान्यपणे वसंत ऋतूमध्ये बहुतांश साप प्रणय करतात. हिवाळ्यात होणारी ब्रुमेशन नावाची ही प्रक्रिया इतर प्राण्यांच्या हायबरनेशन प्रक्रियेसारखीच असते. त्यानंतरचं हवामान त्यांच्या प्रजनन प्रक्रियेसाठी अनुकूल असतं. भौगोलिक विविधतेमुळे पृथ्वीवरील विविध ठिकाणी सापांच्या प्रणयाचे ऋतू वेगवेगळे असू शकतात. उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय (उष्ण कटिबंध व समशीतोष्ण कटिबंध यांदरम्यानचा भूप्रदेश) भागात संपूर्ण वर्षभराच्या काळात सापांचा प्रणय सुरू असतो.

3/7
इतर प्राण्यांप्रमाणेच प्रणय आणि आकर्षण हे सापांच्या प्रजनन प्रक्रियेतले सर्वांत महत्त्वाचे पैलू आहेत. सापाची मादी शारीरिकदृष्ट्या जेव्हा प्रजननासाठी तयार होते, तेव्हा ती एक विशेष गंध सोडते. नर साप वारंवार जीभ बाहेर काढून हा गंध ओळखण्याचा प्रयत्न करतो आणि संबंधित मादीच्या शोधात निघतो. दोघंही जवळ आल्यानंतर प्रणय प्रक्रियेचा पुढचा टप्पा सुरू होतो.

4/7
पालींप्रमाणेच सापालाही दोन लिंग असतात, हे फार कमी जणांना माहिती असेल. त्यांना 'हेमी पेनिस' म्हणतात. प्रणयादरम्यान दोन्हींपैकी एकाचा वापर करता येतो. उजवा आणि डावा हेमिपेनिस दोन्ही एकेका अंडकोषाला (टेस्टिकल्स) जोडलेले असतात. त्यांच्या लिंबवर (Limb) लहान काटे किंवा हूकसारखे आकार असतात. ते त्यांना दीर्घ काळ इंटरकोर्स करण्यास मदत करतात.

5/7
सापांच्या अनेक प्रजातींमध्ये संभोग करण्यापूर्वी नर-मादी एकमेकांशी भांडतात. काही प्रजातींमध्ये तर त्यांची एकमेकांशी चांगलीच झटापट होते; मात्र झटापटीत ते एकमेकांना चावत नाहीत किंवा एकमेकांवर विष फेकत नाहीत. एका मादीने एकावेळी एकाच नराशी समागम करावा असा काही नियम नाही. अनेकदा दोन किंवा अधिक सापही एकत्र समागम करतात.

6/7
सापांच्या समागम प्रक्रियेत मादी वर्तुळाकारात बसते. याला मेटिंग बॉल किंवा ब्रीडिंग बॉलदेखील म्हणतात. जेव्हा अनेक साप एकत्रित प्रणयात गुंतलेले असतात तेव्हा अशा प्रकारचे बॉल तयार होण्याची शक्यता जास्त असते. एका वेळी प्रणयात डझनभर सापही सहभागी होऊ शकतात.

7/7
मादीच्या शेपटीच्या खाली एक छिद्र असते ज्याला क्लोआका म्हणतात. नर आणि मादी सापांचे रिप्रॉडक्टिव्ह अवयव या क्लोआकामध्ये आढळतात. नर सापाचे शुक्राणू त्याच्या लिंगाद्वारे मादीच्या प्रजनन अवयवामध्ये प्रवेश करतात. नर सापाला दोन लिंग असतात आणि ती दोन्हीही सक्रिय असतात. एका मादीशी समागम केल्यानंतर त्याला लगेच दुसरी मादी सापडते तेव्हा त्याचं हे दुसरं लिंग उपयोगी पडतं.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement