Shiv Jayanti: चक्क मोहरीवर साकारले छत्रपती! नाशिकच्या तरुणीची अशीही शिवभक्ती, जागतिक विक्रम!

Last Updated:
Shiv Jayanti: नाशिकच्या तरुणीने छत्रपती शिवाजी महाराजांचे रंगीत छायाचित्र चक्क एका राईच्या दाण्यावर साकारले आहे. विशेष म्हणजे तिने त्यासाठी कोणताही भिंगाचा चष्मा वापरलेला नाही.
1/7
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती 19 फेब्रुवारीला सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवरायांवर प्रेम करणारे असंख्य यांचे मावळे हे महाराजांची कलाकृती मोठ्यात मोठ्या वस्तूंवरती साकारून महाराजांना मानवंदना देत असतात. 

advertisement
2/7
नाशिक मधील ऐश्वर्या औसरकर नामक ध्येयवेड्या तरूणीने छत्रपती शिवाजी महाराजांचे खास चित्र साकारले आहे. दैनंदीन आहारातील फोडणीसाठी वापरण्यात येणाऱ्या व डोळ्यांनाही दिसणार नाही अशा एका बारीक राईवर त्यांनी रंगीत चित्र रेखाटले आहे. जिचे मोजमाप हे अवघे 1.40 मि.मी. आहे.

3/7
विशेष म्हणजे हे चित्र साकारताना त्यांनी कुठल्याही प्रकारच्या भिंगाचा केलेला नाही. मोहरीवर रंगीत चित्र काढून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला आहे. महत्वाची बाब म्हणजे औसरकर यांच्या अंगी असलेल्या सूक्ष्म कलेची दखल आपल्या देशातील नामांकित संस्था इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.

4/7
कुठल्याही प्रकारच्या भिंगाचा वापर न करता सूक्ष्म चित्र काढणारी पहिली महिला सूक्ष्म चित्रकार म्हणून ऐश्वर्या यांच्या नावाची अधिकृत घोषणा संस्थेच्या संकेत स्थळावर करण्यात आलेली आहे. त्या संदर्भातील प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व पदक त्यांना मिळाले आहे.

5/7
देशातील व बाहेरील देशातील अनेक सूक्ष्म चित्रकार हे चित्र काढत असताना विविध प्रकारच्या भिंगांचा वापर करत चित्र काढत असतात. परंतु नाशिक मधल्या सूक्ष्म चित्रकार औसरकर यांनी कुठल्याही प्रकारचा भिंगाचा वापर केलेला नाही. तसेच चक्क 1.40 मि. मी. इतक्या सूक्ष्म राई वरती छत्रपती शिवरायांचे रंगीत चित्र साकारले आहे.

6/7
ऐश्वर्या यांच्या या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यामुळे सूक्ष्म चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. इतकेच नव्हे तर लंडनमधील प्रसिद्ध नामांकित संस्था वर्ल्ड वार्ड बुक ऑफ रेकॉर्ड ह्या संस्थेने देखील त्यांच्या ह्या कलेची दखल घेतली आहे.

7/7
भारतातील एकमेव व कुठ्ल्याही प्रकारचा भिंगाचा वापर न करता चित्र काढणारी पहिली महिला सूक्ष्म चित्रकार म्हणून औसरकर यांच्या कलेची नोंद जागतिक पातळीवर देखील झाली आहे. या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ वर लवकरच नाव घोषित करणार असल्याचे औसरकर यांना मेल द्वारे कळविण्यात आले आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement