Swiss Cheese Day : टॉम अँड जेरी ज्या चीझसाठी भांडायचे त्या चीझवर होल का माहितीये?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Hole on Swiss Cheese : टॉम अँड जेरी कार्टुनमध्ये तुम्ही हा होलवाला चीझ पाहिलाच असेल. कार्टुनमधील चीझ म्हणून अनेकांना हे डिझाइन वगैरे वाटलं असेल. पण या चीझवरील होलची स्टोरी वेगळीच आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
स्वीस चीजमध्ये वापरला जाणारा एक विशेष बॅक्टेरिया म्हणजे Propionibacterium freudenreichii. हा चीज मॅच्युअर होत असताना लॅक्टिक अ‍ॅसिडचं रूपांतर प्रोपिऑनिक अ‍ॅसिड, अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड आणि कार्बन डायऑक्साइडमध्ये करतो. याच कार्बन डायऑक्साइडमुळे चीजच्या आत हवेचे फुगे तयार होतात. चीज बाहेरून घट्ट असल्यामुळे हा गॅस बाहेर जाऊ शकत नाही आणि आतच साचून मोठी गोल छिद्रं तयार करतो. हीच छिद्रं आपण स्वीस चीजवर पाहतो.
advertisement
सर्व स्वीस चीजवर सारखीच छिद्रं असतात असं नाही. त्यांचा आकार आणि संख्या बॅक्टेरियाचं प्रमाण, चीज किती दिवस मॅच्युअर केलं आहे, तापमान आणि आर्द्रता, दूध किती स्वच्छ आहे यावर अवलंबून असतं. पूर्वीच्या काळी दूध थोडं कमी फिल्टर केलं जायचं. त्यामुळे त्यात सूक्ष्म गवताचे कण असायचे. हे कण गॅस साठण्याचा केंद्रबिंदू बनायचे, त्यामुळे छिद्रं मोठी आणि स्पष्ट दिसायची. आजकाल दूध जास्त स्वच्छ केल्यामुळे काही वेळा छिद्रं लहान किंवा कमी दिसतात.
advertisement
काही आधुनिक स्वीस चीज प्रकारांमध्ये छिद्रं खूपच कमी किंवा अजिबात नसतात. पण पारंपरिक Emmental चीजमध्ये छिद्रं असणं हे गुणवत्तेचं आणि ओळखीचं लक्षण मानलं जातं. छिद्रं फक्त दिसायला वेगळी वाटतात असं नाही, तर त्यांचा चीजच्या चव आणि सुगंधाशीही संबंध असतो. ज्या प्रक्रियेमुळे छिद्रं तयार होतात, त्याच प्रक्रियेमुळे स्वीस चीजला त्याची खास चव मिळते.







