जेव्हा कॅप्टन कूल त्याच्या मूळगावी जातो तेव्हा...20 वर्षांनी गावकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी याचे जगभरात असंख्य चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी लोक जीवाचं रान करतात. गर्दीतूनही मिळेल तसा त्याचा फोटो काढतात. त्यात त्याला हात मिळवण्याची संधी मिळाली किंवा त्याच्यासोबत आपला फोटो काढता आला, तर काही विचारायलाच नको. चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
advertisement
उत्तराखंडच्या अल्मोडा भागातील ल्वाली हे धोनीचं मूळगाव आहे. त्याचे वडील पान सिंह धोनी यांनी जवळपास 45 वर्षांपूर्वी इथून झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमध्ये स्थलांतर केलं होतं. त्यामुळे धोनी लहानाचा मोठा तिथेच झाला. परंतु म्हणतात ना की, माणूस कुठेही राहिला तरी त्याची नाळ आपल्या मूळ मातीशी जोडलेली असते.
advertisement
advertisement
तब्बल 20 वर्षांनंतर धोनी आपली पत्नी साक्षी आणि काही मित्रांसह बुधवारी मूळगावात दाखल झाला. त्याला पाहून गावकरी आश्चर्यचकीत झाले. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत कोणाच्याच आनंदाला काही पारावर उरला नव्हता. त्यांनी पारंपरिक पद्धतीने त्याचं स्वागत केलं. धोनीनेही सर्वांची आपुलकीने विचारपूस केली. तिथल्या लोकांशी अगदी त्यांच्यातला एक होऊन तो बोलत होता.
advertisement
बुधवारी सकाळी साधारण 10:30 वाजताच्या सुमारास धोनी गावात पोहोचला. त्यानंतर सगळ्यांना भेटून, सगळ्यांसोबत फोटो काढून कुलदेवतेचं दर्शन घेऊन दुपारी 1:30 वाजता तिथून निघाला. तेव्हा गावकऱ्यांनी त्याच्याकडे पुन्हा नक्की ये, अशी हक्काची मागणी केली. दरम्यान, धोनीमुळे गावात एखाद्या सोहळ्यासारखं वातावरण निर्माण झालं होतं.