Weird Place : इथं दिवसभर असते लोकांची गर्दी; रात्र होताच गायब होतं ते ठिकाण

Last Updated:
Weird Place : पांढरीशुभ्र वाळू, निळंशार पाणी आणि हजारो पर्यटकांनी भरलेले एक सुंदर वाळूचं बेट. पण सूर्यास्त होताच संपूर्ण बेट गायब होतं. या ठिकाणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले आहेत.
1/7
जगभरात फिरण्यासाठी बरीच ठिकाणं, यासोबतच काही रहस्यमयी ठिकाणंही आहेत. असंच एक ठिकाण जे दिवसभर लोकांनी गजबजलेलं असतं. दिवसभर इथं लोकांची गर्दी असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक इथं असतात पण रात्र होताच हे संपूर्ण ठिकाण अचानक गायब होतं.

advertisement
2/7
या ठिकाणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले आहेत.पांढरीशुभ्र वाळू, निळंशार पाणी आणि हजारो पर्यटकांनी भरलेले एक सुंदर वाळूचं बेट. पण सूर्यास्त होताच संपूर्ण बेट गायब होतं. हो, दिवसा जिथे लोक दिसतात ते ठिकाण रात्री गायब होतं. दिसतो तो फक्त समुद्र, बेटाचा कोणताही मागमूस उरत नाही. पण सकाळ होताच तेच बेट पुन्हा दिसतं.
या ठिकाणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले आहेत. पांढरीशुभ्र वाळू, निळंशार पाणी आणि हजारो पर्यटकांनी भरलेले एक सुंदर वाळूचं बेट. पण सूर्यास्त होताच संपूर्ण बेट गायब होतं. हो, दिवसा जिथे लोक दिसतात ते ठिकाण रात्री गायब होतं. दिसतो तो फक्त समुद्र, बेटाचा कोणताही मागमूस उरत नाही. पण सकाळ होताच तेच बेट पुन्हा दिसतं.
advertisement
3/7
लोक विचारतात,
लोक विचारतात, "हे जादुई ठिकाण आहे का?" उत्तर नाही आहे. हे जादुई ठिकाण नाही, तर फिलीपिन्सचे प्रसिद्ध व्हॅनिशिंग आयलंड आहे, जे बोहोल प्रांताजवळील लिलिबोरान आणि पांगलाओ दरम्यानआहे. हे कायमचं बेट नाही, तर समुद्राच्या मध्यभागी असलेली भरती-ओहोटीची एक मोठी वाळूची पट्टी आहे. ती सुमारे 1 किलोमीटर लांब आणि 300 मीटर रुंद आहे.
advertisement
4/7
जेव्हा भरती कमी असते म्हणजे सकाळी 8 ते दुपारी 3-4 वाजेपर्यंत, तेव्हा पाणी कमी होतं आणि वाळूची पट्टी दिसू लागते. पर्यटक बोटीने येतात इथं येतात वॉक करतात, स्नॉर्कलिंग करतात, सी फूड खातात, फोटोशूट करतात.  समुद्रकिनारा तात्पुरत्या छत्र्या, टेबल, खुर्च्या आणि फोटोग्राफीच्या साधनांनी सजवलेला असतो. दिवसा, तो सहजपणे  2000-3000 लोकांना आकर्षित करतो.

5/7
पण दुपारी 4-5 वाजता भरती येऊ लागल्याने पाणी हळूहळू वाढू लागतं. प्रथम, छत्र्या बुडतात, नंतर टेबल आणि खुर्च्या, नंतर संपूर्ण वाळूची पट्टी. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, संपूर्ण बेट 3-5 फूट पाण्याखाली बुडतं. रात्री फक्त खोल समुद्र उरतो. म्हणूनच त्याला अदृश्य बेट म्हणतात.

6/7
स्थानिक टूर गाईड म्हणतात की, पर्यटकांना नेहमीच दुपारी 3.30 पर्यंत परत बोलावलं जातं. जर कोणी उशीरा आला तर बोटवाले दुप्पट पैसे आकारतात. कधीकधी कपल्स प्रेमात इतके रमतात की त्यांना उशीर होतो, रात्री बोट रेस्क्यू करावं लागतं.

7/7
जगात असेच अनेक भरती-ओहोटीचे वाळूचे कडे आहेत, ज्यात ऑस्ट्रेलियाचा ग्रेट सँडी आणि भारतातील दिवा बेट (गुजरात) यांचा समावेश आहे, परंतु फिलीपिन्समधील एक सर्वात सुंदर आणि सर्वात व्हायरल आहे. 2025 मध्ये हे ठिकाण फिलीपिन्समधील टॉप 5 पर्यटन स्थळांमध्ये सूचीबद्ध आहे. येथील पाणी इतकं स्वच्छ आहे की मासे स्पष्टपणे दिसतात. टूर पॅकेजेस फक्त 500-800 पेसो म्हणजे 700-1100 रुपयेमध्ये उपलब्ध आहेत, ज्यामध्ये बोट, जेवण आणि स्नॉर्कलिंगचा समावेश आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement