UK Election Result: ब्रिटनच्या पंतप्रधानांना किती मिळतं वेतन? भारताच्या तुलनेत किती आहे जास्त?

Last Updated:

भारतापाठोपाठ ब्रिटनमध्येही सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे. या सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पार्टीचा विजय झाला.

News18
News18
भारतापाठोपाठ ब्रिटनमध्येही सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे. या सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पार्टीचा विजय झाला. तिथल्या जनतेने पंतप्रधान म्हणून कीर स्टार्मर यांना पसंती दिली आहे. एक्झिट पोलचे अंदाज तंतोतत खरे ठरले आहेत. ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या पंतप्रधानांचं वेतन किती आहे, त्यांच्या आणि भारताच्या पंतप्रधानांच्या वेतनात किती फरक आहे?
ब्रिटनच्या पंतप्रधानांना राहण्यासाठी सरकारी निवासस्थान मिळतं. त्याला '10, डाउनिंग स्ट्रीट' असं नाव आहे. 10, डाउनिंग स्ट्रीट हे 1735 पासून ब्रिटनच्या पंतप्रधानांचं निवासस्थान म्हणून वापरलं जात आहे. काही पंतप्रधान स्वत:साठी 11 क्रमांकाचा पर्यायही निवडतात. नुकतेच पायउतार झालेले पंतप्रधान ऋषी सुनक हे आपल्या कुटुंबासह 10, डाउनिंग स्ट्रीटवर राहत होते. नवीन पंतप्रधान कीर स्टार्मर कोणता पर्याय निवडतील, याबाबत उत्सुकता आहे. ब्रिटनमध्ये पंतप्रधानांचं एक कार्यकारी कार्यालयदेखील आहे. तिथे ते महत्त्वाच्या कामांसाठी दररोज बैठका घेतात.
advertisement
ब्रिटिश पंतप्रधानांच्या वेतनाबद्दल बोलायचं झालं तर त्यांना दरमहा पाच लाख 78 हजार रुपये वेतन मिळतं. म्हणजे त्यांना दर वर्षी 1 कोटी 73 लाख 44 हजार रुपये वेतन मिळतं. यापैकी 83 लाख 72 हजार रुपये खासदार असल्यामुळे मिळतात. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना याच नियमानुसार वेतन मिळत होतं. नवीन पंतप्रधान किअर स्टार्मर यांनादेखील एवढंच वेतन मिळेल.
advertisement
भारताच्या पंतप्रधानांना किती वेतन?
भारताच्या पंतप्रधानांचं वेतन ब्रिटिश पंतप्रधानांपेक्षा कमी आहे. आपल्या देशात पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीला सरकारकडून दरमहा 1 लाख 66 हजार रुपये वेतन मिळतं. यामध्ये मूळ वेतन 50 हजार रुपये, खर्च भत्ता तीन हजार रुपये, संसदीय भत्ता 45 हजार रुपये आणि दोन हजार रुपये दैनिक भत्ता यांचा समावेश आहे. यानुसार, भारतीय पंतप्रधानांना दर वर्षी वेतन म्हणून अंदाजे 19 लाख 92 हजार रुपये मिळतात. ब्रिटनच्या पंतप्रधानांना भारतीय पंतप्रधानांपेक्षा जास्त वेतन मिळतं.
मराठी बातम्या/Politics/
UK Election Result: ब्रिटनच्या पंतप्रधानांना किती मिळतं वेतन? भारताच्या तुलनेत किती आहे जास्त?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement