Sharad Pawar: '...म्हणून मी त्यावेळी खोटं बोललो,' शरद पवारांनी सांगितली 'त्या' बॉम्बस्फोटाची आठवण
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या काळात शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी स्फोटाच्या घटनेनंतर शरद पवारांवर अनेक स्तरांतून टीका झाली होती, त्याचसंदर्भातील एक किस्सा आज शरद पवारांनी भाषणाच्या दरम्यान सांगितला....
मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये आजही माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या नाव आदराने घेतलं जातं. 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या काळात शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी स्फोटाच्या घटनेनंतर शरद पवारांवर अनेक स्तरांतून टीका झाली होती, त्याचसंदर्भातील एक किस्सा आज शरद पवारांनी भाषणाच्या दरम्यान सांगितला.
काय म्हणाले शरद पवार?
मुंबईत 1993 साली साखळी बॉम्बस्फोटांची धक्कादाय घटना घडली होती. शरद पवारांनी या साखळी स्फोटांबाबत केलेल्या एका विधानानं पुढे बराच गोंधळ माजवला. 11 ठिकाणी स्फोटाच्या घटना घडल्या असतानाही शरद पवारांनी 12 ठिकाणी झाल्याचं सांगितलं होतं. यावरून वाद झाला. मात्र, असं स्फोटाच्या ठिकाणांची संख्या वाढवून का सांगितली, याबाबत त्यांनी पुढे स्पष्टीकरणही दिलं. तोच प्रसंग शरद पवारांनी आज पुन्हा सांगितला.
advertisement
'मी खोटं बोललो कारण...'
"मी त्यावेळी 11 ऐवजी 12 ठिकाणी स्फोट झाला असे म्हणालो कारण, त्यावेळी लोकांमध्ये फक्त हिंदू बहुल भागात स्फोट झाले, असा संदेश जाणे धोक्याचे होते. म्हणून मी हाजी अली येथे 12 वा स्फोट झाल्याचं नमूद केलं. यामुळे संभाव्य हिंदू-मुस्लिम संघर्ष टाळता आला. त्यावेळी पुण्यातील आरडीएक्स फॅक्टरीचे काम बंद होते. त्यामुळे ती स्फोटकं कराचीतून आल्याचं स्पष्ट होतं". असा प्रसंग घडल्याचं शरद पवारांनी सांगितलं. व्यापक समाजहित डोळ्यांसमोर ठेवत पवार खोटं बोलले हे यावरून स्पष्ट होतं.
advertisement
कुठे झाले होते स्फोट?
view comments12 मार्च 1993 ला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, शिवसेना भवन, सेंच्युरी बाजार, एअर इंडिया बिल्डिंग, हॉटेल जुहू सेंटॉर, झवेरी बाजार, प्लाझा सिनेमा, पासपोर्ट ऑफिस वरळी, काथा बाजार वरळी, हॉटेल सी रॉक, सहारा विमानतळ (आताचं छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ) या ठिकाणी स्फोट झाले. तर 12 वा स्फोट हाजी अली येथे झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 26, 2024 10:31 PM IST
मराठी बातम्या/Politics/
Sharad Pawar: '...म्हणून मी त्यावेळी खोटं बोललो,' शरद पवारांनी सांगितली 'त्या' बॉम्बस्फोटाची आठवण


