10 वर्षांच्या राधा गायीचा मृत्यू, शेतकऱ्यानं केलं वर्षश्राद्ध, किर्तनही ठेवलं अन् गावकऱ्यांना दिलं श्रीखंड पुरीचं जेवण, VIDEO

Last Updated:

cow shraddha in pune - प्रगतशील शेतकरी धनंजय पोळ यांनी आपल्या राधा या गाईचे वर्ष श्राद्ध थाटामाटात केले. या गोमातेचे निधन वर्षांपूर्वी झाले होते. वर्षभरानंतर कुटुंबातील सदस्याप्रमाणे हिंदू धर्मातील सर्व धार्मिक विधी पार पाडत या गायीचे श्राद्ध घालण्यात आले.

+
10

10 वर्षांच्या राधा गायीचा मृत्यू, शेतकऱ्यानं केलं वर्षश्राद्ध

शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे - हिंदू संस्कृतीत गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोमाता आणि शेतकरी यांचे अतूट बंधन आहे. गोमाता ही कामधेनू मानली जाते. तसेच तिचे दुध हे आरोग्यदायी तर गोमूत्र आणि शेणाचा वापर शेतीतील उत्पादन वाढीसाठी आवश्यक मानला जातो. एकीकडे माणसा माणसातील नाती कमकुवत होत असताना प्रगतशील शेतकऱ्याने एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. प्रगतशील शेतकरी धनंजय पोळ यांनी आपल्या राधा या गाईचे वर्ष श्राद्ध थाटामाटात केले. या गोमातेचे निधन वर्षांपूर्वी झाले होते. वर्षभरानंतर कुटुंबातील सदस्याप्रमाणे हिंदू धर्मातील सर्व धार्मिक विधी पार पाडत या गायीचे श्राद्ध घालण्यात आले.
advertisement
प्रगतिशील शेतकरी धनंजय रघुनाथ पोळ हे भोर तालुक्यातील बाजारवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांच्या घरी खिलार जातीची गाय राधा नावाची गाय होती. राधा गायीने घराचे नंदनवन केले. वासरू ते 10 वर्षांच्या सहवासात राधा गायी ही पोळ कुटुंबाची सदस्य बनली. घरातील लहान थोरांची आवडती असणारी राधा हिचा मृत्यू झाला. मात्र, तिच्या मृत्यूनंतर घरातील एक सदस्य गेला. या भावनेतून तिचे दहावे, तेरावे आणि आता प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध विधी थाटात करण्यात आला.
advertisement
गायीचे आणि शेतकऱ्याचे अतुट नाते असते. शेतकरी आपल्या गायींना जीवापाड जपतात. प्रेम करतात. घरातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतात. शेतकरी हा आपल्या गायीच्या भरोशावर प्रपंचाचा गाडा हाकतात. पण त्या गायीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे त्यांनीही राधा या लाडक्या गायीचा माणसांप्रमाणे वर्ष श्राद्ध विधी केला. जसे माणूसाचा मृत्यू झाल्यानंतर सर्व विधी पार पाडतात, त्याचप्रमाणे 10 वर्षे मुलीप्रमाणे सांभाळलेल्या राधा गायीचा मृत्यू झाल्यानंतर सर्व विधी पार पाडण्यात आले.
advertisement
किर्तनही ठेवले -
महिला सबलीकरणाच्या पुरस्कर्त्या, राष्ट्रीय किर्तनकार नेहा भोसले साळेकर यांनी सुश्राव्य किर्तनात गाय आणि आई हेच फक्त निस्वार्थ प्रेम करु शकते या शब्दात गाईचे महत्त्व विशद केले. यावेळी गायीची विधिवत पूजा करून, सुहासिनींनी औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. 21 गायींना पुरणपोळी चारण्यात आली.
advertisement
गावकऱ्यांना दिले श्रीखंड पुरीचे जेवण -
तसेच खिलार जातीची गायी ज्यांच्याकडे आहे अशा 21 शेतकऱ्यांना हरिपाठाची पुस्तके भेट देत टॉवेल, टोपी, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. वर्ष श्राद्ध निमित्ताने संपूर्ण गावाला श्रीखंड पुरीचे गाव जेवण देण्यात आले. जेवणांनंतर भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. वर्षश्राध्दाच्या विधीसाठी सातारा, रायगड, पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी, नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मराठी बातम्या/पुणे/
10 वर्षांच्या राधा गायीचा मृत्यू, शेतकऱ्यानं केलं वर्षश्राद्ध, किर्तनही ठेवलं अन् गावकऱ्यांना दिलं श्रीखंड पुरीचं जेवण, VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement