Pune: गजानन आंघोळीला नदीवर गेला परत आलाच नाही, दुसऱ्या दिवशीचं दृश्य पाहून गावं रडलं
- Published by:Sachin S
Last Updated:
गजाननच्या अकस्मात मृत्यूने केंद्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे: पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भोर तालुक्यातील नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. मागील ४८ तासांपासून त्याचा शोध घेतला जात होता. अखेरीस दुसऱ्या दिवशी नदीपात्रात मुलाचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या भोर तालुक्यातील हातावे बुद्रुक इथं दुपारच्या सुमारास ही घटना घडली. नदी पात्रामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गजानन नामदेव केंद्रे असं पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे.
advertisement
काय घडलं नेमकं?
शुक्रवारी दुपारच्या सुमारास गजानन पोहण्यासाठी नदीवर गेला होता. पोहताना अचानक गजानन खोल पाण्यात नदीत बुडाला. गजानन केंद्रेला पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाला. बराच वेळ झाला तो नदीतून बाहेर आला नाही. त्यामुळे नदी परिसरात उपस्थित असणाऱ्यांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांना याची माहिती दिली.
बराच वेळ झाला गजानन घरी न आल्यामुळे सगळीकडे शोध सुरू झाला. पण, कुठेही त्याचा पत्ता लागला नाही. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी तात्काळ ही माहिती हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाला दिली. पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. नदीमध्ये शोध मोहीम राबवत गजाननचा मृतदेह दुसऱ्या दिवशी पाण्याबाहेर काढण्यात आला आहे.
advertisement
मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला. गजाननच्या अकस्मात मृत्यूने केंद्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे. राजगड पोलीस पुढील तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 8:28 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune: गजानन आंघोळीला नदीवर गेला परत आलाच नाही, दुसऱ्या दिवशीचं दृश्य पाहून गावं रडलं





