Moffat Arogya Shibir Pune: आरोग्यम् धनसंपदा! तपासणीपासून ऑपरेशनपर्यंत सर्व मोफत, पुण्यातील संस्थेचा अनोखा उपक्रम, Video

Last Updated:

2018 पासून सुरू झालेल्या या शिबिरांत आरोग्य तपासण्या आणि ऑपरेशन विनामूल्य केली जातात.

+
News18

News18

पुणे : स्वर्गीय राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज हे गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करत आहेत. 2018 पासून सुरू झालेल्या या शिबिरांत आरोग्य तपासण्या आणि ऑपरेशन विनामूल्य केली जातात. फाउंडेशनला त्यांच्या सेवाभावी कार्यासाठी अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत. या आरोग्य शिबिराची माहिती विठ्ठलराव वरुडे पाटील यांनी लोकल 18 ला दिली आहे.
नियमितपणे मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन
2018 सालापासून स्वर्गीय राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिरे नियमितपणे आयोजित केली जात आहेत. या शिबिरांत शेकडो लोकांच्या आरोग्य तपासण्या झाल्या असून, अनेक नागरिकांची ऑपरेशन्स विनामूल्य करण्यात आली आहेत.
advertisement
शिबिरांमध्ये नेत्रबिंदू तपासणी आणि संबंधित सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. यासोबतच बीपी, शुगर तपासणी आणि ज्येष्ठ नागरिकांना चष्मे वाटप देखील मोफत केले जाते. आरोग्य तपासणीसह आवश्यक औषधे व ऑपरेशन्सदेखील विनामूल्य उपलब्ध असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे कॅन्सर तपासणीदेखील केली जाते. जर एखाद्या व्यक्तीस कॅन्सर आढळला, तर त्यावरील उपचार, औषधांचा खर्च आणि ऑपरेशनसह संपूर्ण खर्च संस्थेतर्फे केला जातो.
advertisement
या आरोग्य शिबिरांना समता फाउंडेशन मुंबई, देसाई हॉस्पिटल मोहम्मद वाडी आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांचेही सहकार्य मिळते. आतापर्यंत अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.
सामाजिक उपक्रमांतही पुढाकार
संस्थेचे संस्थापक विठ्ठलराव वरुडे पाटील हे आरोग्य शिबिरांबरोबरच अनेक सामाजिक कामांत सक्रिय आहेत. त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेले माय माऊली हे वृद्धाश्रम वडीलधाऱ्या नागरिकांसाठी आधारस्थान ठरले आहे. येथे अनेक ज्येष्ठांचा विनामूल्य सांभाळ केला जातो.
मराठी बातम्या/पुणे/
Moffat Arogya Shibir Pune: आरोग्यम् धनसंपदा! तपासणीपासून ऑपरेशनपर्यंत सर्व मोफत, पुण्यातील संस्थेचा अनोखा उपक्रम, Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement