Pooja Khedkar: पूजा मॅडमचा कारनामा आईला भोवला; आता कंपनीच काढली विकायला?
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
वादग्रस्त आय.ए.एस अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. हे कमी होत की काय त्यातच आता त्यांच्या कुटुंबियांच्या नावे पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या कोट्यवधी रूपयांच्या कंपनीचा देखील आता लिलाव केला जाणार आहे. तसा इशारा महापालिकेने दिला आहे.
गोविंद वाकडे, प्रतिनिधी
पुणे: वादग्रस्त आय.ए.एस अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. हे कमी होत की काय त्यातच आता त्यांच्या कुटुंबियांच्या नावे पिंपरी चिंचवड शहरात असलेल्या कोट्यवधी रूपयांच्या कंपनीचा देखील आता लिलाव केला जाणार आहे. नेमका या कंपनीचा लिलाव का केला जात आहे, कंपनीत नेमकं काम चालायचं?
कंपनीचा होणार लिलाव?
पिंपरी चिंचवड शहरातील एमआयडीसी परिसरातील कोट्यवधीच्या भूखंडावर असलेली ही कंपनी वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांच्या नावे आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून पूजा खेडकर यांनी अपंग असल्याचे तिसरे सर्टिफिकेट मिळवले होते, हे सर्टिफिकेट मिळत असताना त्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील रहिवाशी असल्याचा पुरावा सादर करत एक रेशन कार्ड, आधार कार्ड सादर केले होते. मात्र त्यांनी कागदपत्रांवर दिलेला पत्ता खोटा निघाला आणि उघडकीस आली या कंपनीची माहिती.
advertisement
धक्कादायक बाब म्हणजे ही कंपनी मागील अनेक वर्षापासून बंद आहे. त्यामुळेच कंपनीकडे लाखो रुपयांच्या कर थकल्याने ती सिल करण्यात आली. मात्र एवढ्यात न थांबता खेडकर कुटुंबीयांनी कराची रक्कम निर्धारित वेळेत न भरल्यास या कंपनीचा लिलाव करणार असल्याचं महापालिकेच्या कर संकलन विभाग प्रमुखांनी स्पष्ट केल आहे.
एकीकडे पूजा खेडकर यांच्या आईच्या नावे असलेल्या या कंपनीचा लिलाव करण्यासाठी महापालिकेच्या कर संकलन विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून घेतलेल्या अपंग प्रमाणपत्रच नियम बाह्य पद्धतीने दिल्या गेल्याचे आरोप झाल्याने त्याची देखील उच्च स्तरीय चौकशी केली जात आहे. या संदर्भातली चौकशी केलेला अहवाल थेट दिल्ली दरबारी म्हणजे देशाच्या दिव्यांग कल्याण मंत्रालयाकडे पाठवला जाणार असल्याची माहिती स्वतः आयुक्तांनाच दिली आहे.
advertisement
त्यामुळे एकीकडे कर न भरल्यास पूजा खेडकर यांच्याशी संबंधित असलेल्या या कंपनीचा लिलावा होईल, तर दुसरीकडे खेडकर यांनी वायसीएम रुग्णालयातून मिळवलेल्या अपंग प्रमाणपत्राच्या चौकशीत कोणी दोषी आढळलं तर त्याचं उत्तर देखील पूजा खेडकर यांना द्यावं लागणार आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांचा पाय आता आणखी खोलात जाताना दिसत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
July 27, 2024 6:01 PM IST


