advertisement

अमोल कोल्हेंचा छगन भुजबळांबद्दल मोठा गौप्यस्फोट,अजितदादांची इच्छा बोलून दाखवली, म्हणाले...

Last Updated:

या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना अमोल कोल्हे यांनी विलीनीकरणाच्या मुद्यावर महत्त्वाचं भाष्य केलं. 

News18
News18
अभिजित पोते, प्रतिनिधी
पुणे: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार गट आणि अजितदादा गटाच्या विलीनीकरणाची चर्चा रंगली आहे. पण, विलीनीकरणाच्या मुद्यावर दोन्ही गटामध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. अशातच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी 'छगन भुजबळ हे राज्यसभेवर जावं अशी इच्छा एकदा अजित पवार यांनी बोलून दाखवली होती' असा गौप्यस्फोट केला आहे.
advertisement
पुण्यात सावित्राबाई फुले विद्यापीठामध्ये व्याख्यानाला विरोध झाल्यानंतरही अमोल कोल्हे अखेरीस कार्यक्रमाला हजर झाले आणि आपल्या शैलीत त्यांनी खणखणीत व्याख्यानं दिलं. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना अमोल कोल्हे यांनी विलीनीकरणाच्या मुद्यावर महत्त्वाचं भाष्य केलं.
राष्ट्रवादीबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी बोलणं झालं आहे. जयंत पाटील हे अर्थमंत्री होतील, अशी चर्चा आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, अमोल कोल्हे म्हणाले की,  "या संदर्भामध्ये मी अनेक वृत्तवाहिनीशी मी बोललोय, माझी प्रतिक्रिया दिली आहे. अशी काही चर्चा झाली आहे. त्याबद्दल मला फारशी माहिती नाही. ज्यांच्यासोबत चर्चा झाली आहे. दादा नाही, त्याबद्दल काय बोलणार आहे" अशी प्रतिक्रियाा दिली.
advertisement
प्रदेशाध्यक्षपद ठरलं, उपमुख्यमंत्रिपदही ठरलं होतं, असा टोला भुजबळांनी तुम्हाला लगावला होता. या प्रश्नावर अमोल कोल्हे म्हणाले की, "आदरणीय भुजबळ साहेब खूप मोठे आहे. त्यांचा त्रागा मी समजू शकतो.  जातनिहाय जनगणना होत असताना भुजबळ यांच्यासारख्या वरीष्ठ नेता हा संसदेत असणे ही महत्वाची गोष्ट होती. अजितदादांनी ओघात सांगितलं होतं की, भुजबळ साहेब राज्यसभेत जावे अशी एक इच्छा होती. अशी एक चर्चा आमची अंतर्गत झाली होती. सामजिक प्रश्नाचा जाण असणारा नेता न जाता कोट्यवधी रुपये घेऊन निवडणूक रणनिती आखणारी व्यक्ती राज्यसभेवर जाण्याची चर्चा येत असेल तर त्यामुळे कदाचित भुजबळ साहेब अस्वस्थ असतील' असं म्हणत अमोल कोल्हे यांनी भुजबळांबद्दल गौप्यस्फोट केला आहे.
advertisement
तसंच,  महत्त्वाची बाब म्हणजे, त्या चर्चेत  अजितदादांनी त्यांना चर्चेत का घेतलं नाही हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तुमच्याचं माध्यमातून एक व्हिडीओ समोर आला होता. तो तपासून घ्यावा. त्यामध्ये भुजबळ साहेबाविषयी सुतोवाच आहेत, असंही कोल्हेंनी सांगितलं.
अजितदादांच्या अपघाताचे सीसीटीव्ही का दिले जात नाही? 
या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज हे देता येत नसेल तर संशय बळावत आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणी पाठपुरावा केला आहे. त्यांनी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे दुध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे.  अशा पद्धतीने जर कोणतीही गोष्ट समोर येत असेल तर सीसीटीव्ही फुटेज दिले जात नाही, तर या प्रकरणाचं सत्य हे समोर आलं पाहिजे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
अमोल कोल्हेंचा छगन भुजबळांबद्दल मोठा गौप्यस्फोट,अजितदादांची इच्छा बोलून दाखवली, म्हणाले...
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement