एस्ट्राझेनकाने कोविशिल्डच्या धोक्याबद्दल 2021मध्येच सांगितलं होतं, सीरमचा मोठा खुलासा

Last Updated:

भारतासह जगभरात कोविशिल्डची निर्मिती आणि वितरण करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने मोठा खुलासा केला आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
पुणे : एस्ट्राझेनका कंपनीने तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्डमुळे टीटीएस हा दुर्मीळ दुष्परिणाम होऊ शकतो अशी माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान, हा धोका खूपच कमी प्रमाणात असल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. एस्ट्राझेनका कंपनीने कोविशिल्डमुळे टीटीएस हा दुर्मीळ आजार होतो असं लंडन उच्च न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये सांगितलं होतं. आता भारतासह जगभरात कोविशिल्डची निर्मिती आणि वितरण करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने मोठा खुलासा केला आहे. कोविशिल्डचा धोका एस्ट्राझेनका कंपनीने २०२१ मध्येच सांगितला होता असं स्पष्टीकरण सीरमने दिलं आहे.
एस्ट्राझेनकाची कोविशिल्ड लस सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केली आणि कोट्यवधी भारतीयांना या लसीचे डोस देण्यात आले. सीरमकडून तयार करण्यात आलेल्या या लसीचे डोस भारतात २०२१ आणि २०२२ मध्ये देण्यात आले. जगभरात ७ उत्पादकांमध्ये सीरमचाही समावेश होता. कोविशिल्डची लस भारतीयांना देण्याआधी त्याच्या मानवी चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर इतर देशांनाही सीरमकडून एक अब्ज डोस पुरवण्यात आले होते.
advertisement
एस्ट्राझेनकाने तयार केलेल्या कोविशिल्डमुळे टीटीएस म्हणजेच थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम यासह थ्रोम्बोसिस होऊ शकतो. लंडनच्या न्यायालयात कंपनीने हे मान्य केलं आहे. या आजारात शरीरातील रक्तात गाठी होऊ शकतात. यामुळे हृदयरोग, ब्रेन स्ट्रोकसह इतर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र ही समस्या अत्यंत दुर्मीळ असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
मराठी बातम्या/पुणे/
एस्ट्राझेनकाने कोविशिल्डच्या धोक्याबद्दल 2021मध्येच सांगितलं होतं, सीरमचा मोठा खुलासा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement