Pune: पुणेकरांची PMP बस गेली तोट्यात, मार्गांची होणार फेररचना, असा आहे प्लॅन!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
पीएमपी संचलनातील काही मार्गावर बस तोट्यात जात आहेत त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचलनातील तूट कमी करण्यासाठी बस मार्गांची फेररचना करण्यात येणार आहे.
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (पीएमपी) संचलनातील काही मार्गांवर बस तोट्यात जात आहेत. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचलनातील तूट कमी करण्यासाठी बस मार्गांची फेररचना करण्यात येणार आहे. यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पीएमपी तब्बल 1,000 सीएनजी बसेस खरेदी करणार असून, महसूल वाढीसाठी बस डेपोच्या जागांचा व्यावसायिक वापर करण्याचाही प्रस्ताव मंजूर झाला आहे. या बैठकीस पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित होते.
अनेक मार्ग तोट्यात, तोट्यातील मार्गांची फेररचना
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीत पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा सुरू आहे. या सेवेत अनेक मार्ग संचलनातील तूट असूनही चालू आहेत. त्यामुळे शहरातील या मार्गांची सध्या तपासणी करून त्यांची फेररचना करणे आवश्यक आहे. यासाठी सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे. हा सल्लागार कोणता मार्ग तोट्यात आहे आणि त्या मार्गाची गरज काय आहे हे तपासून अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर या मार्गाची फेररचना करण्यात येणार आहे.
advertisement
पीएमपीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी उपाययोजना
पीएमपी उत्पन्नात वाढ करण्यासाठी बसडेपोच्या जागा तसेच इतर मिळकतींचा कसा वापर करता येईल? या विषयावर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यासाठी एक सल्लागार नियुक्त केला जाणार आहे. सुरुवातीला एक बसडेपो व्यावसायिक वापरासाठी कसा उपयोग करता येईल? याचा प्रायोगिक प्रकल्प राबवला जाईल. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 24, 2025 2:49 PM IST