पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी दहीहंडी! 35 मंडळांच्या त्या कृतीचं सर्वत्र कौतुक

Last Updated:

आमची हंडी मोठी की तुमची, अशी स्पर्धा अनेक मंडळानमध्ये पाहायला मिळते. मात्र पुण्यातील 35 मंडळानीं यावेळी एकत्र येऊन दहीहंडी उत्सव साजरा केला.

+
पुण्याच्या

पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 35 मंडळानीं एकत्र येतं साजरा केला दहीहंडी उत्सव 

शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे: गोविंदा आला रे आला', 'अरे बोल बजरंग बली की जय'चा जयघोष करत पुण्यात 35 मंडळानीं एकत्र येतं दहीहंडी साजरी केली. पुण्याच्या इतिहासात एवढ्या मंडळानी एकत्र येतं उत्सव साजरा केल्याचं पहिल्यांदा घडलं. त्यामुळे या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. या संयुक्त दहीहंडीमध्ये पुणेकरांचा उत्साह दिसून आला. गोविंदाच्या गाण्यांवर पुणेकर थिरकताना दिसून आले.
advertisement
आमची हंडी मोठी की तुमची, अशी स्पर्धा अनेक मंडळानमध्ये पाहायला मिळते. मात्र पुण्यातील 35 मंडळानीं यावेळी एकत्र येऊन दहीहंडी उत्सव साजरा केला. तसेच एक अनोखा एकोप्याचा सामाजिक संदेश देखील दिलाय. पुण्यातील लालमहाल चौक या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात आला. रात्री उशिरा दहीहंडी उत्सव संपन्न झाला. पुण्यातील काही ढोलपथकांनी यावेळी सलग 3 तास वादन देखील केले.
advertisement
दहीहंडीचा उत्साह
ढोलपथकांचे वादन आणि गोविंदाच्या गाण्यावर थिरकत अनेकजण या संयुक्त दहीहंडीसाठी जमले होते. गोविंदा पथकांनी पहिल्यांदा कडक सलामी दिली. त्यानंतर आला तो, श्वास रोखून धरणारा क्षण. एकावर एक असे गोविंदा पथकांचे सहा ते सात थर चढू लागले. अशा रीतीने मोठ्या जल्लोषात हा दहीहंडी साजरा झाला.
advertisement
म्हणून केली संयुक्त दहीहंडी
अनेक मंडळांकडून प्रमुख रस्ते आणि चौकात दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याने वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचे हाल होतात. सुरक्षा व्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. तसेच प्रत्येक मंडळाने स्वतंत्र दहीहंडी कार्यक्रम आयोजित केल्यास ध्वनी प्रदूषणाचे प्रमाणही वाढते. ही बाब लक्षात घेऊन युवा उद्योजक पुनीत बालन यांनी मंडळाना एकत्र येऊन संयुक्त दहीहंडी करण्यासंबंधीचे आवाहन केले होते, असं सांगितलं.
मराठी बातम्या/पुणे/
पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी दहीहंडी! 35 मंडळांच्या त्या कृतीचं सर्वत्र कौतुक
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement