कबड्डीची तालीम करत दहीहंडी पथक सुरू; मुंबईतील डॉक्टर, पोलीस विवाहित महिलांच्या जिद्दीची कहाणी, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
या पथकातील महिला स्वतःचे घर सांभाळून दहीहंडी पथकात सामील झाल्या आहेत. या पथकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पथकातील 50 टक्के महिला विवाहित आहेत. त्यांचे घर आणि जबाबदारी सांभाळून त्या दहीहंडीचा सरावही उत्तमरित्या सांभाळतात.
निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई : एक स्त्री आता चूल आणि मूल या पलीकडे जाऊन स्वतःची विशेष एक उंची गाठत आहे. प्रत्येक क्षेत्रात आता पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करत आहेत. याचेच आता आणखी एक उदाहरण म्हणजे दहीहंडी पथकातील महिला.
आज सर्वत्र दहीहंडीचा उत्साह साजरा केला जात आहे. विलेपार्लेच्या जॉली स्पोर्ट्स क्लबमधील कबड्डीच्या समुहातील मुलींनी कबड्डीची तालीम करता करता आपण सुद्धा दहीहंडी पथक सुरू करू असा विचार मांडला. तसेच कबड्डीच्याच समूहातील मुलींनी एकत्र येऊन दहीहंडी पथकाची स्थापना केली.
advertisement
या पथकातील महिला स्वतःचे घर सांभाळून दहीहंडी पथकात सामील झाल्या आहेत. या पथकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पथकातील 50 टक्के महिला विवाहित आहेत. त्यांचे घर आणि जबाबदारी सांभाळून त्या दहीहंडीचा सरावही उत्तमरित्या सांभाळतात. या पथकाची आणखीन एक अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे या पथकात विविध क्षेत्रातील महिला कार्यरत आहे.

advertisement
डॉक्टर, पोलीस अशा सर्व महिला एकत्र कार्यरत आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान पथकातील महिलांची विशेष काळजी घेतली जाते. कोणालाही कुठेही इजा होणार नाही याच्याकडे विशेष लक्ष दिले जाते. फक्त दहीहंडी नाही तर वर्षभर त्यांना इतर प्रशिक्षण देण्यात येते. तसेच कबड्डीचाही सराव यांच्याकडून करून घेतला जातो.
advertisement
दहीहंडी पथकाच्या मुलींना सरावासोबतच आरोग्याची आणि शरीराची योग्य काळजी घ्यावी लागते. जॉली स्पोर्ट्स क्लबच्या वतीने या महिलांची काळजी घेतली जाते. यावर्षीही याठिकाणी मोठा उत्साह दिसून आला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 27, 2024 6:20 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
कबड्डीची तालीम करत दहीहंडी पथक सुरू; मुंबईतील डॉक्टर, पोलीस विवाहित महिलांच्या जिद्दीची कहाणी, VIDEO