मुंबईत याठिकाणी महिलांना मिळाला हंडी फोडण्याचा मान, मंदिराचा इतिहासही अनोखा, VIDEO

Last Updated:

या मंदिराची कथा सांगताना पुजारी म्हणाले की, तेथील एका भाविकाच्या स्वप्नात जवळपास शिवलिंग असल्याचा भास झाला. यानंतर तेथील नागरिकांनी मंदिराच्या परिसरात खोदकाम सुरू केले. खोदकाम सुरू झाल्यानंतर त्यांना शिवलिंग आढळलं.

+
महिलांनी

महिलांनी फोडली दहीहंडी

निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई : आतापर्यंत आपण अनेक मंदिरांमध्ये कृष्ण जन्म साजरा होताना पाहिले असेल. पण गोरेगाव पश्चिमेकडील स्वयंभू शिवमंदिरातून कृष्ण जन्मासोबतच दहीहंडी देखील साजरी केली जाते. या परिसरातील नागरिक नेहमी सर्वांसोबत गुण्यागोविंदाने राहतात. तसेच सर्व सण असल्यावर एकत्र येऊन साजरा देखील करतात. विशेष म्हणजे या स्वयंभू शिवमंदिरात कृष्ण जन्म झाल्यानंतर महिलांना हंडी फोडण्याचा मान मिळाला. या मंदिराचा इतिहास नेमका काय आहे, याबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
काय आहे या मंदिराचा इतिहास -
या मंदिराची कथा सांगताना पुजारी म्हणाले की, तेथील एका भाविकाच्या स्वप्नात जवळपास शिवलिंग असल्याचा भास झाला. यानंतर तेथील नागरिकांनी मंदिराच्या परिसरात खोदकाम सुरू केले. खोदकाम सुरू झाल्यानंतर त्यांना शिवलिंग आढळलं. शिवलिंग आढळल्यानंतर येथील मंदिराची स्थापना झाली.
advertisement
मुंबईमध्ये आपल्याला बरीच मंदिरं पाहायला मिळतात. पण स्वयंभू असणाऱ्या मंदिरांची संख्या फार कमी आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारचा झगमगाट नसून येथील मंदिर त्यांची जुनी संस्कृती आणि परंपरा जपताना दिसत आहे. सण उत्सव असल्यावर येथील महिला एकत्र येऊन वेगवेगळी कार्यक्रम करत असतात. तसेच मंदिरातील इतर सदस्य देखीलही या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात.
advertisement
International Dog Day : मुंबई पोलिसांनी केला पोलीस डॉग लिओचा सन्मान, अशी आहे त्याची कहाणी, VIDEO
आज दहीहंडीच्या निमित्ताने याठिकाणीही हा सण साजरा केला गेला. या स्वयंभू शिवमंदिरात कृष्ण जन्म झाल्यानंतर महिलांना हंडी फोडण्याचा मान मिळाला. गोरेगाव मधील हे स्वयंभू मंदिर मुंबईच्या मंदिरांच्या मुंबई मंदिरांच्या इतिहासातील एक अद्भुत मंदिर आहे, असे म्हणायला हरकत नाही.
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत याठिकाणी महिलांना मिळाला हंडी फोडण्याचा मान, मंदिराचा इतिहासही अनोखा, VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement