गुजरातच्या गवतामुळे वाढले दुधाचे उत्पन्न, सोलापूरचा शेतकरी कमावतोय महिन्याला दीड लाख रुपये, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
शशिकांत पुदे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते मोहोळ तालुक्याती शेज बाभूळगाव येथील रहिवासी आहे. शशिकांत पुदे यांनी आपल्या शेतात गजराज, दशरथ घास आणि जिंजवा या गवताची लागवड केली आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : शेतकरी शेती बरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे पूरक व्यवसायही करत असतो. त्यामध्ये शेळीपालन, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय आणि दुग्धव्यवसाय इत्यादी प्रकारचे वेगवेगळे व्यवसायांचा समावेश आहे. या माध्यमातून शेतकरी आपले उत्पन्न वाढवत असतो. असाच एक अनोखा उपक्रम सोलापूरच्या शेतकऱ्याने करुन दाखवला आहे.
शशिकांत पुदे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते मोहोळ तालुक्याती शेज बाभूळगाव येथील रहिवासी आहे. शशिकांत पुदे यांनी आपल्या शेतात गजराज, दशरथ आणि जिंजवा या गवताची लागवड केली आहे. या गवतामुळे खिल्लार गाईंना पौष्टिक आहार मिळाल्याने एक गायी पाच ते साडेपाच लीटर दूध देत आहे. नेमका ते हा व्यवसाय कसा करत आहेत, यातून त्यांना कसे उत्पन्न मिळत आहे, याचबाबत लोकल18 च्या टीमने त्यांच्याशी संवाद साधला.
advertisement
शशिकांत पुदे हे खिलार गाई संवर्धन करत आहे. तसेच खिलार वळू पालनसुद्धा आहे. या सर्व प्राण्यांना लागणाऱ्या चाऱ्यासाठी शेज बाभूळगाव इथे त्यांनी नवनवीन प्रयोग केले आहेत. शशिकांत पूदे यांनी आपल्या गजराज, दशरथ आणि गुजरात वरून आणलेल्या जिंजवा या गवताची लागवड केली आहे. या गवतामुळे गायींना पौष्टिक आहार मिळत आहे. त्यामुळे एक गाय दिवसाला पाच ते साडेपाच लिटर दूध देत आहे.
advertisement
सध्या त्यांच्या गोठ्यात 9 गायी, 2 कालवडी आणि 3 वळू आहेत. सध्याच्या काळात दररोज 15 ते सहा 18 लिटर दूध जमा होत आहे. हे दूध मोहोळ शहरातील ग्राहकांना 80 रुपये प्रतिलीटर दराने विकले जाते. तसेच दरमहा 3 ते 5 किलो तूपनिर्मिती केली जाते. तुपाला प्रतिकिलो 3 हजार रुपयांचा भाव मिळतो.
advertisement
जिंजवा हे गवत शशिकांत पुदे यांनी गुजरातमधुन आणलेले आहे. या गवताची ऊंची 5 फुटापर्यंत वाढते. एकीकडे ज्यावेळेस भरपूर चारा उपलब्ध असतो. त्याची कटींग करुन त्याला वाळवून त्याचे पेंढ्या बांधून ठेवले तरीही राहते. या जिंजव्याची वैशिष्ट्ये अशी आहे की, हा चारा दुधाच्या गाईसाठी अतिशय पौष्टिक आहे.
advertisement
नर्सरीचा बिझनेस, महिन्याला तब्बल 3 लाखांचा नफा, 5 वर्षातच बीडमधील व्यक्तीने व्यवसाय यशस्वी!
शशिकांत पुदे यांनी गजराज, दशरथ आणि जिंजवा या तिघांना एकत्रित करुन एक प्लॉट तयार केला आहे. त्या प्लॉटिंगची कटिंग करून गायींना चारा म्हणुन याचा उपयोग केला जातो. या गवतामुळे शशिकांत पुदे यांच्या गायींना पौष्टिक आहार मिळाल्याने एक गाय पाच ते साडेपाच लिटर दूध देत आहे. तर दिवसाला एक गाय 10 ते 11 लीटर दूध देत आहे. तर महिन्याकाठी व्यवस्थापन खर्च वजा करून दूध विक्रीतून पुदे यांना 1 लाख ते दीड लाख रुपयांचं उत्पन्न मिळत आहे, अशी माहिती त्यांनी लोकल18 शी बोलताना दिली.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
August 27, 2024 2:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
गुजरातच्या गवतामुळे वाढले दुधाचे उत्पन्न, सोलापूरचा शेतकरी कमावतोय महिन्याला दीड लाख रुपये, VIDEO