International Dog Day : मुंबई पोलिसांनी केला पोलीस डॉग लिओचा सन्मान, अशी आहे त्याची कहाणी, VIDEO

Last Updated:

मुंबईतील पोलीस डॉग लिओ हा मुंबईतील पोलीस दलात काम करणारा अत्यंत विश्वासू श्वान आहे. तो साडेसात वर्षांचा असून त्याने आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या केस सोडवण्यामध्ये पोलिसांची मदत केलेली आहे.

+
पोलीस

पोलीस डॉग लिओ

साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : 26 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय श्वान दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या घराचा राखणदार, पोलीस किंवा सैन्यदलात काम करणारा, विश्वासू साथीदार आणि सहायक प्राणी म्हणून कुत्र्यांनी समाजात बजावलेल्या विविध भूमिकांचे कौतुक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
मुंबईतील पोलीस डॉग लिओ हा मुंबईतील पोलीस दलात काम करणारा अत्यंत विश्वासू श्वान आहे. तो साडेसात वर्षांचा असून त्याने आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या केस सोडवण्यामध्ये पोलिसांची मदत केलेली आहे. खुनाची केस, मिसिंग केस, अपहरण, चोरी या सगळ्या प्रकरणांमध्ये लिओची मदत झालेली आहे.
advertisement
एका अपहरणाच्या केसमध्ये तर पोलीस डॉग लिओने फक्त 90 मिनिटांमध्ये हरवलेल्या मुलाचा शोध घेतला होता. हा शोध फक्त त्याने त्याच्या कपड्यांच्या वासावरून घेतला होता. यावरून त्याची बुद्धिमत्ता आणि कर्तबगारी दिसून येते. चोरीच्या केस मध्ये सुद्धा एकदा लिओने सांगितल्यामुळे मोठ्या प्रकरणाचा छडा लागला.
नर्सरीचा बिझनेस, महिन्याला तब्बल 3 लाखांचा नफा, 5 वर्षातच बीडमधील व्यक्तीने व्यवसाय यशस्वी!
'आजपर्यंत अनेक प्रकरणांमध्ये पोलीस डॉग लिओने आम्हाला खूप मदत केली आहे. तो आता साडेसात वर्षांचा आहे. त्याच्या प्रेमामुळे आणि आतापर्यंतच्या अनुभवामुळे आम्ही कायमच त्याच्यावर प्रचंड विश्वास ठेवतो,' असे पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब विष्णु शिंदे यांनी सांगितले.
advertisement
माणूस आणि त्यांचे श्वान यांचे नाते अनोखे असते. श्वान किती प्रामाणिक आणि कृतज्ञ असतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोलीस डॉग लिओ आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
International Dog Day : मुंबई पोलिसांनी केला पोलीस डॉग लिओचा सन्मान, अशी आहे त्याची कहाणी, VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement