हातावर गोंदलेलं त्रिशूळ, तळवटात बांधलेला मृतदेह अन् वर साडी; नदीपात्रात आढळला तरुणाचा मृतदेह, दौंडमध्ये खळबळ
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
हा मृतदेह अत्यंत निर्घृणपणे आधी एका प्लास्टिकच्या तळवटात (ताडपत्री) आणि बारदानात गुंडाळला होता. इतकेच नव्हे तर, हे गाठोडे सुटू नये म्हणून त्यावर एका साडीने घट्ट गाठी बांधल्या होत्या
दौंड: दौंड शहरातील भीमा नदीपात्रात एका अज्ञात तरुणाचा निर्घृण खून करून प्रेत फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावताना कमालीची क्रूरता दाखवल्याचे समोर आले असून, या घटनेने दौंड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृतदेहाची अवस्था पाहून पोलीसही चक्रावले
भीमा नदीवर असलेल्या रेल्वे पुलाजवळ शनिवारी एका गोणीसारख्या वस्तूचा संशयास्पद साठा काही नागरिकांना दिसला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली असता, त्यात एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. मारेकऱ्यांनी हा मृतदेह अत्यंत निर्घृणपणे आधी एका प्लास्टिकच्या तळवटात (ताडपत्री) आणि बारदानात गुंडाळला होता. इतकेच नव्हे तर, हे गाठोडे सुटू नये म्हणून त्यावर एका साडीने घट्ट गाठी बांधल्या होत्या. मृतदेहाची ही अवस्था पाहून हा नियोजित कट रचून केलेला खून असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
advertisement
ओळखीसाठी हातावरचा 'त्रिशूळ' महत्त्वाचा दुवा
मयत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र, पोलिसांना त्याच्या उजव्या हातावर 'त्रिशूळ' गोंदलेले आढळले आहे. या त्रिशूळाच्या चिन्हावरून आणि साधारण ३५ वर्षे वयावरून पोलीस त्याचा तपास करत आहेत. मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह नदीत फेकला असावा, असे मानले जात आहे.
पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली जात असून, सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू आहे. गुन्हेगारांनी मृतदेह बांधण्यासाठी वापरलेली साडी आणि तळवट कोठून आणले, याचाही शोध घेतला जात आहे. भरवस्तीत आणि रेल्वे पुलासारख्या ठिकाणी अशा प्रकारे मृतदेह सापडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 9:18 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
हातावर गोंदलेलं त्रिशूळ, तळवटात बांधलेला मृतदेह अन् वर साडी; नदीपात्रात आढळला तरुणाचा मृतदेह, दौंडमध्ये खळबळ








