Pune: पुण्यात अग्नितांडव, रुग्णालयाखाली असलेल्या फटाक्याच्या दुकानात भीषण आग, घटनास्थळाचा VIDEO
- Reported by:Govind Wakde
- Published by:Sachin S
Last Updated:
घटनेची माहिती मिळताच 3 अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पुणे : पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयाखाली असलेल्या फटाक्याच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. आगीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी परिसरातील तापकीर चौकात ही घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास गजानन मल्टीस्पेशालिट हॉस्पिटल या खासगी रुग्णालयाखाली असलेल्या फटाक्याच्या दुकानात अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुपधारण केलं. आगीचा भडका उडाल्यामुळे संपूर्ण दुकान आगीच्या भक्षस्थानी सापडलं.
घटनेची माहिती मिळताच 3 अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दुकानाला आग का लागली याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. सुदैवामे आगीमध्ये कुणी अडकलं आहे, याची माहिती समोर आली नाही. या फटाक्याच्या दुकानाला बाजूला सिलेंडर दुरस्तीचं दुकान आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
advertisement
रुग्णालयामध्ये याआगीमुळे कुणी अडकलं आहे, याचा तपास केला जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल असून आग विझवण्याचा आटोकात प्रयत्न करत आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 6:44 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune: पुण्यात अग्नितांडव, रुग्णालयाखाली असलेल्या फटाक्याच्या दुकानात भीषण आग, घटनास्थळाचा VIDEO











