पुण्यात महापूर; रेस्क्यू ऑपरेशन सुरू, सिंहगडरोडवरील ग्राऊंड स्थिती दाखवणारा VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पाण्यात अ़डकलेल्या नागरिकांना बोटीद्वारे सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
पुणे, वैभव सोनवणे : पुण्यातील पुराचा धोका वाढला आहे. पहाटेपासून पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. पुराचा धोका वाढला असून अनेक नागरिक अडकले आहेत. तळमजले सगळे पाण्याखाली गेली आहे. तर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. निंबजनगरात पुरसदृश परिस्थिती, पार्किंगमधल्या गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. पुणेकरांना वाचवण्यासाठी अक्षरश: बोटी रस्त्यावर उतरल्या आहेत.
पुण्यात पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झालेत. पाण्यात अ़डकलेल्या नागरिकांना बोटीद्वारे सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 25, 2024 2:37 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात महापूर; रेस्क्यू ऑपरेशन सुरू, सिंहगडरोडवरील ग्राऊंड स्थिती दाखवणारा VIDEO


