advertisement

Pune: पुण्याच्या शाळेमध्ये गँगवार, 2 विद्यार्थ्यांवर चाकूने सपासप वार; पोलीसही हादरले

Last Updated:

नववीत शिकणाऱ्या मुलाने आठवीतल्या दोन मुलांवर प्राणघातक हल्ला केला आहे.

News18
News18
सचिन तोडकर, प्रतिनिधी
जुन्नर : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. मारामाऱ्या, रस्त्यावर कोयता घेऊन दहशत पसरवण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. अशातच शिक्षणाचं माहेर घर समजलं जाणाऱ्या पुण्यातील जुन्नरमध्ये शाळेत आता गँगवारचा प्रकार समोर आला आहे. एका गटाने दुसऱ्या गटावर प्राणघातक हल्ला केला. या हल्लात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने अपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील शाळेत हा प्रकार घडला आहे.  नववीत शिकणाऱ्या मुलाने आठवीतल्या दोन मुलांवर प्राणघातक हल्ला केला आहे. या  हल्लात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे. पार्थ यादव (वय १४) आणि आयुष वाळूंज अशी जखमी विद्यार्थ्यांची नावं आहे. शाळेमध्ये नववीच्या वर्गातील मित्रांची भांडण सुरू होती. ती भांडणं सोडवायला सोडवायला आठवीच्या वर्गातील पार्थ यादव आणि आयुष वाळूंज ही दोन मुलं गेली. पण त्यांच्या भांडणामध्ये गेल्यामुळे दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली.
advertisement
त्यानंतर संतापलेल्या नवव्या वर्गातील मुलाने दोन्ही विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला केला. या मुलाने दोन्ही मुलांवर चाकूने वार केला. दोन्ही विद्यार्थी गंभीर जखमी असून एका विद्यार्थींच्या श्वास नलीकेत गंभीर जखम झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया संपन्न केली आहे.
विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल
जखमी मुलाच्या मामा निखल दांगड यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. ज्या मुलावर गुन्हा दाखल झाला तो विधीसंघर्ष असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याचं आणि इतर मुलांसोबत भांडण सुरू होतं. आयुष हा भांडण सोडवण्यासाठी गेला होता. त्यावेळी संतापलेल्या आरोपी मुलाने आयुषच्या पाठीवर चाकूने वार केला. त्यानंतर आयुषला वाचवण्याासाठी पुढे आलेल्या पार्थच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आला. पार्थला गंभीर दुखापत झाली आहे. दोघांवर कोकणे रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी विधीसंघर्ष मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे, अशी माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक विश्वासराव जाधव यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune: पुण्याच्या शाळेमध्ये गँगवार, 2 विद्यार्थ्यांवर चाकूने सपासप वार; पोलीसही हादरले
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement