लग्नाचा 50वा वाढदिवस, अन् नातवंडांनी धूमधडाक्यात लावलं आजी आजोबाचं लग्न, पुण्यातील अनोखा लग्नसोहळा

Last Updated:

लग्नाचा वाढदिवस साजरा करताना प्रामुख्याने यात रात्री साखरपुडा, हळद, मेहंदी, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

+
नातवंडांनी

नातवंडांनी धूमधडाक्यात लावून दिलं आजी आजोबाचं लग्न 

शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : प्रेमाला वय आणि बंधन नसतं म्हणतात तेच खरं आहे. आजवर अशा अनेक लग्नाच्या बातम्या आपण पाहिल्या किंवा वाचल्या असतील, ज्यांनी त्यांच्या वयाच्या उत्तरार्धात आपल्या जोडीदारासह पुन्हा एकदा नव्याने रेशीमगाठ बांधली. पुण्यात अशीच एक घटना समोर आली आहे. आहे. एका नातवाने आपल्या आजी आजोबांच्या 50 व्या लग्नवाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांचं धूमधडाक्यात लग्न लावून दिलं.
advertisement
पुण्यातील भोर तालुक्यातील जयश्री आणि विठ्ठलराव यादव या आपल्या आजी आजोबांचा विवाह धूमधडाक्यात करण्यात आला. लग्नाचा वाढदिवस साजरा करताना प्रामुख्याने यात रात्री साखरपुडा, हळद, मेहंदी, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यात सकाळी होम हवन, अभिषेक, रुखवत, मुंडावळ्या बांधून व अंतरपाट धरुन मित्र मैत्रिणीच्या साक्षीने मंगलाष्टका म्हणत अक्षदा टाकून लग्न लावले. तसेच मामांच्या हस्ते कन्यादान करण्यात आले. नवरा नवरींसह उपस्थितांनीही उखाणे घेतले. 81 वर्षीय आजीबाईंना कलवरीचा मान मिळविला.
advertisement
स्टील काम करणारा मिस्तरी रातोरात झाला करोडपती, Dream11 वर जिंकले तब्बल 1 करोड
लग्नाचा 50 वा वाढदिवस केक कापून आजी आजोबांनी एकमेकांना केक भरवत अनोखा वाढदिवस साजरा केला. बजाज चेतक गाडीवर फोटो काढण्याचा मोह वधु वरास आवरता आला नाही. "आम्ही चारही नातवंडानी मिळून आजी आजोबांचा लग्नाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने करायचा निर्णय घेतला आणि मग आम्हाला लग्नाची कल्पना सुचली आणि मग अनोख्या पद्धतीने या दिवस साजरा करण्याचं ठरलं", असं नातू वेदांत यादव याने म्हटलं.
advertisement
यावेळी उभयतांना भेट वस्तू देण्यात आल्या. त्यानंतर उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. एवढेच नव्हे तर वधूवरांच्या राहत्या घरी स्वागताचा कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला. या अनोख्या लग्न सोहळ्याची सगळीकडे एकच चर्चा होत आहे.
advertisement
मराठी बातम्या/पुणे/
लग्नाचा 50वा वाढदिवस, अन् नातवंडांनी धूमधडाक्यात लावलं आजी आजोबाचं लग्न, पुण्यातील अनोखा लग्नसोहळा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement