Hinjawadi IT Park: 'हिंजवडीच्या ट्रॅफिककडे जातीने लक्ष घाला अन्यथा...', सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट इशारा

Last Updated:

हिंजवडीमध्ये कोट्यावधी रुपयाचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय होतो, इथून कंपन्या परराज्यात जात आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya sule Hinjawadi IT Park
Supriya sule Hinjawadi IT Park
पुणे : जगाच्या नकाशावर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या हिंजवडीमध्ये ट्रॅफिक जॅमची मोठी समस्या आहे. या ट्रॅफिकमुळे या परिसरातून अनेक कंपन्यांचे स्थलांतर होत आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार देखील अॅक्शन मोडमध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राज्य सरकारला इशारा दिला आहे. हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घाला, अन्यथा गणपतीनंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा थेट इशारा दिला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, हिंजवडीमध्ये डंपर ट्रक आणि आरएमसी ट्रक नियमबाह्य वेळेत रस्त्यावर धावतात, निवासी भागात आर एम सी प्लांट आहेत. पी एम आर डी ए ने मोकळ्या केलेल्या रस्त्यांवर अजूनही स्क्रॅप, राडारोडा आहे., तसेच रस्त्यावरील खड्डे अजूनही बुजवण्यात आले नाही. हिंजवडीमध्ये कोट्यावधी रुपयाचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय होतो, इथून कंपन्या परराज्यात जात आहेत. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करते की, हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घाला, अन्यथा गणपतीनंतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू...
advertisement

सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका

12 ऑगस्टला हिंजवडी परिसरामध्ये प्रत्युषा संतोष बोराटे या अकरा वर्षाच्या चिमुकलीचा डंपर ट्रक खाली चिरडून दुर्देवी मृत्यू झाला होता. याबाबत सुप्रिया सुळे यांनी आज मान परिसरातील जॉय विले सोसायटीमध्ये जाऊन बोराटे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर हिंजवडीच्या प्रश्नावरून बोचरी टीका केली आहे.
advertisement

अजित पवार देखील अॅक्शन मोडमध्ये

हिंजवडीमधील होत असलेल्या ट्रॅफिकमुळे आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर जाऊ लागल्या आहेत. त्यामुळेच आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीच तातडीने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे अजित पवार यांनी राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी येथील विविध नागरी समस्यांबाबत पाहणी केली. तसेच, पुणे मेट्रो फेज ३ कामाची व वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपयोजनांची पाहणी करून प्रशासनास आवश्यक सूचना केल्या होत्या.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Hinjawadi IT Park: 'हिंजवडीच्या ट्रॅफिककडे जातीने लक्ष घाला अन्यथा...', सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट इशारा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement