वाहन धारकांसाठी दिलासादायक बातमी, HSRP नंबर प्लेट जागेवर बसवणार, 'ही' आहे अट
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी सरकारकडून जूनपर्यंतची मुदत वाढ देण्यात आली आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी 25 अर्ज असल्यास जागेवर बसवून देण्यात येईल.
पुणे : एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी सरकारकडून जूनपर्यंतची मुदत वाढ देण्यात आली आहे. उच्च सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी एकाच ठिकाणी किमान 25 किंवा त्यापेक्षा जास्त दुचाकी, चारचाकी, रिक्षा, टॅक्सी, बस किंवा ट्रक मालकांनी अर्ज केले असतील, तर त्यांच्या सोयीच्या ठिकाणी किंवा सोसायटीमध्ये संबंधित एजन्सीमार्फत सुविधा द्यावी. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त होम फिटमेंट शुल्क आकारू नये, अशा सूचना राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, राज्यात एचएसआरपी प्लेट बसविण्याचे कामाला अधिक गती देण्यासाठी फिटमेंट सेंटरची संख्या वाढविण्यात यावी, तशा सूचना सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिल्या आहेत.
advertisement
नोंदणी झालेल्या वाहनांना वितरकाने एचएसआरपी बसविणे बंधनकारक आहे. मात्र नोंदणी झालेल्या बऱ्याच वाहनांना एचएसआरपी नंबर बसविता वाहन वितरकाने तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सर्व बाह्य वितरकांनी नवीन नोंदणी केलेल्या वाहनाचा आढावा घेऊन विना एचएसआरपी वाहन वितरीत केले असल्यास संबंधित वाहन वितरकावर मोटार वाहन कायदा, 1988 प्रक्रियेत असलेल्या नियमानुसार उचित कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 24, 2025 10:30 AM IST









