Indian Railways : पुणे-मुझफ्फरपूर मार्गावरील रेल्वे प्रवाशांना दिलासा! विशेष एक्स्प्रेस 'या' तारखेपासून नियमित धावणार; रेल्वेने केला महत्त्वाचा बदल
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Special Train Service Between Muzaffarpur and Hadapsar : दिवाळीनिमित्त होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.प्रवाशांच्या सोयीसाठी मुझफ्फरपूर ते हडपसर (पुणे) दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे आता नियमित धावणार आहे.
पूजा सत्यवान पाटील प्रतिनिधी पुणे
पुणे : दिवाळीनिमित्त होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मुझफ्फरपूर ते हडपसर (पुणे) दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेला नियमित धावणार आहे. ही गाडी विशेष स्वरूपात हंगामी काळासाठी चालवली जात होती. परंतु वाढत्या प्रवासी संख्येमुळे या गाडीला नियमित करण्यात आले आहे. त्यामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना आणखी रेग्युलर रेल्वे मिळाली आहे.
advertisement
हडपसर रेल्वे स्थानकावरून गाडी क्रमांक (05289/05290) ही विशेष ट्रेन म्हणून धावत होती. आता ही गाडी क्रमांक15589/15590 या नवीन क्रमांकासह नियमित साप्ताहिक एक्सप्रेस म्हणून धावेल. ही नियमित सेवा 8 ऑक्टोबरपासून हडपसर येथून सुरू होईल. गाडी क्रमांक 15589 दर सोमवारी मुझफ्फरपूरहून 19:25 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 6:25 वाजता हडपसर (पुणे) येथे पोहोचेल.
advertisement
या रेल्वे सेवेमुळे दिवाळीनिमित्त होणारी अतिरिक्त गर्दी नियंत्रणात आणण्यास मदत होईल. तसेच प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सोपा आणि आरामदायी होईल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की ही नियमित सेवा वापरून प्रवासाचा लाभ घ्यावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 12:08 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Indian Railways : पुणे-मुझफ्फरपूर मार्गावरील रेल्वे प्रवाशांना दिलासा! विशेष एक्स्प्रेस 'या' तारखेपासून नियमित धावणार; रेल्वेने केला महत्त्वाचा बदल