'जंगल भी वही है और राजा भी वही रहेंगा' सून जिंकली, सासऱ्याने लंगोट घालून केला जल्लोष, हातात अजितदादांचा फोटो, VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
पुण्याच्या जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी थेट लंगोट घालून जल्लोष केला.
पुणे : महाराष्ट्रामध्ये १२ जिल्हा परिषद आणि १२५ नगरपंचायत समिती निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असून काही ठिकाणी विजयी उमेदवारांची नाव झाली आहे. विजयी झाल्यानंतर गुलाल उधळत उमेदवारांनी एकच विजयी जल्लोष सुरू केला आहे, अशातच पुण्यातून नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत असणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी सून जिंकली म्हणून लंगोट घालून जल्लोष केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुण्याच्या जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी थेट लंगोट घालून जल्लोष केला. त्यांच्या सून मोनाली अमोल लांडे या घडाळ्याचा चिन्हावर जिल्हा परिषद निवडणुकीच्या गटात विजयी झाल्या. मोनाली लांडे विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला.
गुलाल उधळत कार्यकर्ते बेभान होऊन नाचत होते, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी चक्क लंगोट घालून आले. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून लांडे यांनी एकच जल्लोष सुरू केला. अजित दादांचा फोटो हातात घेऊन देवराम लांडे हटके जल्लोष केला. देवराम लांडे नेहमीचं या-ना-त्या कारणाने चर्चेत असतात, विजयी जल्लोषात ही तोच कित्ता त्यांनी गिरवला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 1:58 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
'जंगल भी वही है और राजा भी वही रहेंगा' सून जिंकली, सासऱ्याने लंगोट घालून केला जल्लोष, हातात अजितदादांचा फोटो, VIDEO










