Pune News : मराठमोळ्या पुण्यामध्ये कोरियन संस्कृतीची मेजवानी, दक्षिण कोरियाच्या व्यक्तीची पुणेकरांवर भुरळ

Last Updated:

कोरियाचे देगूक बे आणि औरंगाबादच्या डॉ. मयुरी भालेराव या दाम्पत्याने पुण्यात सुरू केलेला कोरियन कॅफे आज लोकप्रिय होत आहे. पुणेकरांना अनोख्या कोरियन संस्कृतीचा आणि खाद्यपदार्थांचा अनुभव मिळत आहे.

+
कॅफे 

कॅफे 

पुणे – प्रेमाला खरंच भाषा किंवा सीमा नसते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे कोरियाचे देगूक बे आणि औरंगाबादच्या डॉ. मयुरी भालेराव. या दाम्पत्याने पुण्यात सुरू केलेला कोरियन कॅफे आज लोकप्रिय होत असून, पुणेकरांना अनोख्या कोरियन संस्कृतीचा आणि खाद्यपदार्थांचा अनुभव मिळत आहे.
देगूक हे मूळचे दक्षिण कोरियातील असून ते संस्कृत शिकण्यासाठी भारतात आले होते. तर डॉ. मयुरी या औरंगाबादच्या रहिवासी असून त्या कोरियन भाषा शिकत होत्या. याच दरम्यान, एका ऑनलाइन लँग्वेज लर्निंग प्लॅटफॉर्मवर त्यांची ओळख झाली. सुरुवातीला भाषेच्या माध्यमातून झालेली ही ओळख हळूहळू मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदलली. काही काळाच्या ओळखी नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जरी घरच्यांचा सुरुवातीला विरोध होता, तरी त्यांनी समजावून सांगून कुटुंबाची मर्जी मिळवली. आज दोघेही आनंदाने पुण्यात स्थायिक झाले आहेत.तीन वर्ष झालं त्यांच लग्न झालं आहे. तर मागील एक वर्षा पासून कॅफे चालवत आहेत.
advertisement
लग्नानंतर देगूक यांनी आपले एक स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात कोरियन कॅफे सुरू करण्याचा. बाणेर परिसरात ‘कॅफे अन्नयोंग’ या नावाने त्यांनी एक वर्षापूर्वी कॅफे सुरू केला. पुण्यातील नागरिक या कॅफेला भेट देत असून कोरियन खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेत आहेत.  पारंपरिक पदार्थांपासून कोरियन शैलीतील पेयांपर्यंत अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत.
advertisement
डॉ. मयुरी यांच्या मते, आम्ही एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतो आणि दोन्ही कुटुंबे मिळून सण साजरे करतो. पुण्यात कॅफेला मिळणारा प्रतिसाद पाहून आम्हाला खूप छान वाटत.
देगूक सांगतात की साऊथ कोरियामध्ये आमचा फॅमिली बिझनेस आहे, पण लग्नानंतर आम्ही पुण्यात राहण्याचा निर्णय घेतला. या शहराने आम्हाला स्वीकारले आणि स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली.
advertisement
‘कॅफे अन्नयोंग’ आता फक्त खाद्यपदार्थांचा नाही, तर सांस्कृतिक देवाणघेवाणीचाही केंद्रबिंदू ठरत आहे. विविध वयोगटातील लोक कोरियन संस्कृतीची ओळख करून घेण्यासाठी येथे येत आहेत. देगूक आणि डॉ. मयुरी यांच्या कॅफे  प्रयत्नांमुळे पुण्यात भारत-कोरिया दोन देशांना आणि दोन संस्कृतींना जोडणारा एक सुंदर दुवा आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : मराठमोळ्या पुण्यामध्ये कोरियन संस्कृतीची मेजवानी, दक्षिण कोरियाच्या व्यक्तीची पुणेकरांवर भुरळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement