TMTची विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एकाच दिवशी ३२ हजार रुपयांचा दंड वसूल

Last Updated:

TMC Bus News : ठाणे महापालिका परिवहन (टीएमटी) विभागाने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. टीएमटीच्या एसी बसमध्ये, विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर तिकिट तपासणाऱ्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

News18
News18
ठाणे महापालिका परिवहन (टीएमटी) विभागाने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. टीएमटीच्या एसी बसमध्ये, विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर तिकिट तपासणाऱ्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिवारी करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. परिवहन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ठाणे परिवहन विभागाकडून अनेकदा विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर वारंवार कारवाई केली जात असल्याची माहिती मिळत आहे.
टीएमटीच्या वातानुकूलित बसमध्ये शनिवारी तिकीट तपासणीदरम्यान दोन प्रवाशांना विना तिकीट प्रवास करताना पकडले. त्यांच्याकडून प्रत्येकी ३०० रुपयांचा दंड आणि तिकिटाची रक्कम वसूल करण्यात आली. मानपाडा परिसरातील लॉकिम कंपनीजवळ एक महिला प्रवासी बसमध्ये चढली, तिने वडवली गावापर्यंत बसमधून विना तिकिट प्रवास केला होता. प्रवास करत असताना ती महिला तिकिट तपासणाऱ्या अधिकाऱ्याला विना तिकिट आढळली. टीएमटी प्रशासनाकडून विनातिकीट प्रवाशांवर वारंवार कारवाई केली जात आहे. अनेकदा विनातिकिट प्रवास करू नका, असं सांगूनही प्रवाशांचे अद्यापही डोळे उघडत नाहीयेत.
advertisement
अनेक फुकटे प्रवासी गर्दीचा गैरफायदा घेत विनातिकिट प्रवास करताना दिसत आहेत. प्रवासादरम्यान अनेकदा कंडक्टर देखील प्रवाशांना तिकिट काढूनच प्रवास करा, अशी माहिती देत असतो. पण तरीही देखील अनेक प्रवासी विनातिकिट प्रवास करतात. दरम्यान, वातानुकूलित बसमध्ये पकडलेल्या प्रवाशाकडून ३०० रुपये दंड वसूल करण्यात येतो, तर सामान्य बसमध्ये २०० रुपये दंड घेतला जातो. शनिवारीच्या दिवशी मोफत प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल ३२ हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे. यावेळी काही प्रवाशांनी वेगवेगळ्या कारणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तपासणी अधिकाऱ्यांनी दंडाची रक्कम वसूल केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
TMTची विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एकाच दिवशी ३२ हजार रुपयांचा दंड वसूल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement