मुंबईसह कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम, नाशिकही तापणार, पाहा हवामानाचा अंदाज
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
संपूर्ण कोकणाला तसेच अकोला जिल्ह्याला 11 मार्चसाठी हिट वेव्हचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर नाशिकमध्ये सकाळच्या वेळी उष्णता राहण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यातील उष्णतेत कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा हा 38 अंशापर्यंत पोहोचला आहे. संपूर्ण कोकणाला तसेच अकोला जिल्ह्याला 11 मार्चसाठी हिट वेव्हचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर नाशिकमध्ये सकाळच्या वेळी उष्णता राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातली पुढील एक-दोन दिवसांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल आणि किमान तापमानाची स्थिती कशी असेल.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगर बरोबरच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना 11 मार्चसाठी हिट वेव्हचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहणार असून कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर पुण्यामध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील. कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूरमध्ये दुपारनंतर ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढे असेल.
advertisement
मराठवाड्यातील प्रमुख शहर छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा हा 39 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्याबरोबर उत्तर महाराष्ट्र देखील तापणार आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये सकाळच्या वेळी काही सहज धुके राहण्याची शक्यता आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमधील कमाल तापमान हे सातत्याने वाढत असून ते 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
advertisement
view comments
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 10, 2025 8:31 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
मुंबईसह कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम, नाशिकही तापणार, पाहा हवामानाचा अंदाज









