उन्हाच्या तडाख्याचा प्राण्यांना त्रास, कशी राखाल निगा? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

सध्या वातावरणात होणाऱ्या तापमान वाढीचा त्रास मानवासह प्राण्यांनाही होत आहे. मार्च महिन्यापासून यंदा तापमानात कमालीची वाढ झाली आहे. तसेच उन्हाच्या तडाख्यामुळे अनेक पशुपक्ष्यांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

+
News18

News18

कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी 
नाशिक : सध्या वातावरणात होणाऱ्या तापमान वाढीचा त्रास मानवासह प्राण्यांनाही होत आहे. मार्च महिन्यापासून यंदा तापमानात कमालीची वाढ झाली आहे. तसेच उन्हाच्या तडाख्यामुळे अनेक पशुपक्ष्यांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. रखरखत्या उन्हामुळे प्राणी आजारी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून उन्हामुळे सर्वात जास्त डिहायड्रेशन, गॅस्ट्रो, भूक मंदावणे यासारखे त्रास होत आहेत. या सर्व आजारांपासून आपल्या प्राण्यांची कशी काळजी घ्याल? याबद्दलचं नाशिक येथील जिल्हा पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त अनंत साखरे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
हिटस्ट्रोकच्या प्रमाणात वाढ
यावर्षी मार्चमध्येच मोठ्या प्रमाणात आपल्याला उन्हाळा जाणवू लागला आहे. या उन्हाचा परिणाम जास्त माणसांवर होत आहे तसा जनावरांवरही होत आहे. गाय, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कुत्री, मांजरी तसेच पोल्ट्री अशा सर्वांना सध्या उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवत असून हिटस्ट्रोकच्या केसेस पशु रुग्णालयात जास्त येत असतात.
advertisement
शेळ्या, मेंढ्यांची निगा कशी राखावी 
शेळ्या, मेंढ्या जर उन्हात जास्त वेळ गेल्या तर उन्हामुळे त्यांच्यात तापमान वाढते. यामुळे त्यांचा गर्भपात होतो. यामुळे भर उन्हात आपल्या शेळ्या आणि मेंढ्या यांना उन्हात फिरवू नये. तसेच मोठ्या प्रमाणात स्वच्छ आणि शुद्ध पाणी त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावे, असं डॉ. अनंत साखरे सांगतात.
advertisement
मोठ्या जनावरांची निगा कशी राखावी 
मोठ्या प्राण्यांमध्ये जर पाहायला गेले तर गाय, म्हशी आणि बैल यांच्या गोठ्यामध्ये योग्य तापमान ठेवणे अत्यंत गरजेचे असून गाय, म्हशी यांसारख्या जनावरांना मुक्त गोठा ठेवणे उत्तम आहे. जनावरांना बांधून न ठेवता गोठ्यात मुक्त वावरण्यास सोडा. मुबलक प्रमाणात पाणी आणि विटामिन सी असलेले प्रोटीन द्या. जेणेकरून स्वतःच्या शरीराचे तापमान हे ते स्वतः सुस्थितीत ठेवतील. तसेच उन्हाळ्यात मोठ्या जनावरांत ऍसिटिक ऍसिडचे प्रमाण वाढते. यामुळे मोठ्या जनावरांना अपचनाचे प्रमाण जास्त दिसते. यामुळे त्यांना सकाळ-संध्याकाळ थोडेसे खायचा सोडा द्यावा आणि थंड वैरण घालण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे दुधाच्या उत्पादनात वाढ होते.
advertisement
घरातील पाळीव प्राणी कुत्री, मांजरी यांची निगा कशी राखावी 
उन्हाळ्यात हिटस्ट्रोकमुळे मोठ्या प्रमाणात श्वान, मांजरी आजारी पडत पडतात. अनेक जातींच्या श्वानांना आणि मांजरांना मोठ्या प्रमाणात केस असतात आणि उन्हाळ्यात त्यांच्या शरीराचे तापमान सुस्थितीत ठेण्यासाठी केस गळती होत असते. यामुळे उन्हाळ्यात जर हे केस काढून टाकले तर उत्तम राहील.
advertisement
तसेच आपल्या श्वानास उन्हात न बांधता त्यांना थंड ठिकाणी ठेवणे योग्य असून अनेक नागरिक आपल्या श्वानांना वातानुकूलित जागेत बसवतात. मात्र, हे सर्वांनाच शक्य नसल्याने कमीत कमी एखादे कापड पाण्यात भिजवून ते थंड ठिकाणी ठेवून त्याच्यावर आपल्या श्वानास बसवावे. तर उन्हाळ्यात आंघोळ न घालता महिन्यातून एकदा घालावी. जेणेकरून जर आंघोळ घातली आणि त्यांचे शरीर संपूर्णपणे कोरडे न झाल्यास त्यांना त्वचेचा आजार उद्भवू शकतो, म्हणून नेहमी आंघोळ घालू नये, असा सल्ला डॉ. अनंत साखरे यांनी दिला.
advertisement
मराठी बातम्या/कृषी/
उन्हाच्या तडाख्याचा प्राण्यांना त्रास, कशी राखाल निगा? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement