काळजी घ्या! सूर्य आग ओकणार! नागपूरसह राज्याला हायअलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
राज्यातील उष्णता सातत्याने वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश प्रमुख शहरातील तापमान हे 39 अंश सेल्सिअसपर्यंत देखील पोहोचले आहे.
मुंबई : राज्यातील उष्णता सातत्याने वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश प्रमुख शहरातील तापमान हे 39 अंश सेल्सिअसपर्यंत देखील पोहोचले आहे. 12 मार्च रोजी संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट असल्याचे पहायला मिळाले. परंतु पुढील काही दिवसात कोकणामध्ये तापमानात घट होणार असून 13 मार्चपासून पुढे काही दिवस कोकणातील जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा कोणताही इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला नाही. पाहुयात 13 मार्च रोजी राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल आणि किमान तापमानाची स्थिती कशी असेल.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहील तर कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढे असेल. मुंबईमध्ये 12 मार्च रोजी 38 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. 13 मार्च रोजी 2 अंशांनी कमाल तापमान कमी होणार असून यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तर पुण्यामध्ये ही कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
advertisement
13 मार्च रोजी पुण्यातील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे असेल. कोल्हापूरमध्ये ही तापमानाचा पारा हा सातत्याने वाढत आहे. कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे.
advertisement
एवढे दिवस मराठवाड्यावर मेहरबान असणारे सूर्यदेव आता पुन्हा एकदा आग ओकायला सुरुवात करत आहेत. मराठवाड्यातील तापमानातही सातत्याने वाढ होत असून संभाजीनगरमध्ये 12 मार्च रोजी 37 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. तर 13 मार्च रोजी संभाजीनगरतील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे.
advertisement
तर राज्यात सर्वाधिक 39 अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नाशिक आणि नागपूरमध्ये नोंदवले गेले. नागपूरमध्ये 13 मार्च रोजी देखील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे असेल. तर नागपूरमध्ये मात्र यावर्षीचे सर्वाधिक कमाल तापमान 13 मार्च रोजी पहायला मिळण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार असून किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे असेल.
advertisement
view comments
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 12, 2025 8:28 PM IST

