Holi 2025: आता संकटं होतील दूर, आयुष्यात येईल सुखाचे रंग, होळीला करा हे उपाय
- Reported by:Niranjan Kamat
- Published by:Mohan Najan
Last Updated:
होलिकेच्या दिवशी लोकांच्या जीवनातल्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी आम्ही काही राशीनुसार उपाय, रंगांच्या बाबतीतल्या काही खास गोष्टी घेऊन आलो आहोत. या तुम्ही पाळल्या तर तुम्हाला येणारं वर्ष सुखात नक्कीच जाईल.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : होळीसारखा महत्त्वाचा सण जवळच येऊन ठेपला आहे. होळीला होलिका दहन आणि धुळवड जोरात साजरी केली जाते. होळीदिवशी सायंकाळी होळीचे पूजन करून पेटवली जाते. तर दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी रंगोत्सव खेळला जातो. माणसाचं जीवन वेगवेगळ्या समस्यांनी भरलेलं असतं. यासाठी काही जण ज्योतिषशास्त्राचा आधार घेतात. यासाठी होलिकेच्या दिवशी लोकांच्या जीवनातल्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी आम्ही काही राशीनुसार उपाय, रंगांच्या बाबतीतल्या काही खास गोष्टी घेऊन आलो आहोत. या तुम्ही पाळल्या तर तुम्हाला येणारं वर्ष सुखात नक्कीच जाईल. ज्योतिषशास्त्राच्या मते, रंग लावताना एखादा विशिष्ट रंग तुम्ही वापरला तर ते तुमच्यासाठी चांगले ठरू शकते. या संदर्भात कोल्हापुरातील ज्योतिषाचार्य गुरुदेव स्वामी यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे.
advertisement
मेष रास - होळी दहन केल्यानंतर लाल रंगाचे वस्त्र घालून 'ओम मंगलाय नमः' या मंत्राचा जप करत त्या भोवती नऊ प्रदक्षिणा पूर्ण करा. तसेच होळीमध्ये सात काळ्या मिरींचे अर्पण करा.
advertisement
वृषभ रास - होळीभोवती गुलाबी रंगाचे वस्त्र घालून अकरा प्रदक्षिणा करा. 'ओम शुक्राय नमः' या मंत्राचा जप करून 11 लवंग होळीला अर्पण करा.
मिथुन - मिथुन राशीच्या जातकांनी हिरवा रंग परिधान करून होळीभोवती सात प्रदक्षिणा पूर्ण कराव्यात. तसेच 21 घेऊन आणि सात हरभरा डाळ घेऊन 'ओम बुधाय नमः' असा जप करत अर्पण करावेत.
advertisement
कर्क - होळीभोवती पांढरा किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करून 'ओम चंद्राय नमः' हा जप करत तीन प्रदक्षिणा करणे. तसेच 28 अखंड तांदूळ आणि तीन मिरे होळीला अर्पण करावे.
सिंह - होळीभोवती लाल किंवा केशरी रंगाचे वस्त्र परिधान करून 'ओम सूर्याय नमः' असा जप करत पाच प्रदक्षिणा पूर्ण करणे. लोबान, उद आणि अकरा गहू होळीला अर्पण करावे.
advertisement
कन्या - हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून होळीभोवती सात प्रदक्षिणा करणे. 'ओम बुधाय नमः' जप करत तीन खाऊचे पाने आणि सात वेलदोडे होळीला अर्पण करावे.
तूळ - गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करून सात प्रदक्षिणा होळीला घालाव्यात. तसेच 21 कापराच्या वड्या आणि अकरा लवंग होळीला अर्पण करावे. सोबत 'ओम शुक्राय नमः' या मंत्राचा जप करावा.
advertisement
वृश्चिक - लाल रंगाचे वस्त्र परिधान करून होळीभोवती अकरा प्रदक्षिणा पूर्ण कराव्यात. तसेच 'ओम भौमाय नमः' या मंत्राच्या जप करत 11 लवंग आणि एक हळकुंड होळीला अर्पण करणे.
धनु - धनु राशीच्या जातकांनी होळी धनगरी थोडे तिळाचे तेल आणि अकरा मिरे अर्पण करावे. तसेच 'ओम बृहस्पती नमः' या मंत्राचा जप करत नऊ प्रदक्षिणा पूर्ण कराव्यात.
advertisement
मकर - केशरी रंगाचे वस्त्र परिधान करून होळीभोवती पाच प्रदक्षिणा पूर्ण कराव्यात. तसेच काळी तीळ आणि अकरा कोळसे खडे अर्पण करावे. सोबत 'ओम शनेश्वराय नमः' या मंत्राचा जप करावा.
कुंभ - कुंभ राशीच्या जातकांनी गुलाबी किंवा निळा रंग परिधान करावा. तसेच 'ओम शनिश्वराय नमः' या मंत्राचा जप करत 11 काळे तीळ आणि तीन कोळसे अर्पण करावे.
मीन - मीन राशीच्या जातकांनी पिवळा रंगाचे वस्त्र परिधान करून 'ओम बृहस्पतये नमः' या मंत्राचा जप करत बारा प्रदक्षिणा पूर्ण करावेत. तसेच पिवळी किंवा पांढरी मोहरी, आणि करंजीचे तेल अर्पण करावे.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Mar 12, 2025 4:47 PM IST










