मुंबई पोलिसांची होळी आणि धूलिवंदनासाठी विशेष नियमावली, पालन न करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
मुंबई पोलिसांनी होळी, होलिका दहन आणि धूलिवंदनाच्या सणासाठी विशेष नियमावली जारी केली आहे. ही नियमावली 12 मार्च 2025 ते 18 मार्च 2025 या कालावधीत लागू राहणार आहे.
मुंबई : यंदा 13 मार्च रोजी होळी आणि 14 मार्चला रोजी धूलिवंदन आहे आणि त्याच दिवशी शुक्रवारचा जुम्मा नमाज देखील आहे. रमजानचा महिना सुरू असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मुंबई पोलिसांनी होळी, होलिका दहन आणि धूलिवंदनाच्या सणासाठी विशेष नियमावली जारी केली आहे. ही नियमावली 12 मार्च 2025 ते 18 मार्च 2025 या कालावधीत लागू राहणार आहे.
मुंबई पोलिसांनी सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी खालील नियम लागू केले आहेत:
1) अश्लीलता टाळा – सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी, नारे किंवा शब्द उच्चारण्यास मनाई आहे.
2) असभ्य वर्तन नको – कोणत्याही प्रकारच्या हावभाव, चित्रे, पोस्टर्स, संकेत किंवा मजकुरामुळे कोणाच्या प्रतिष्ठेला किंवा नैतिकतेला धक्का लागू नये.
3) अनधिकृत रंग फेण्यास बंदी – रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर जबरदस्तीने रंग टाकणे किंवा रंगीत पाणी उडवणे यावर कडक कारवाई केली जाईल.
advertisement
4) पाणी भरलेले फुगे टाकू नका – रंगीत किंवा साध्या पाण्याने भरलेले फुगे बनवणे आणि टाकणे हे पूर्णतः प्रतिबंधित आहे.
5) जबरदस्तीने चंदा वसूल करणाऱ्यांवर कारवाई – होळीच्या नावाखाली जबरदस्तीने पैसे गोळा करणाऱ्यांविरुद्ध पोलिस कठोर कारवाई करतील.
धूलिवंदन आणि जुम्मा नमाज एकाच दिवशी
यावर्षी 14 मार्चला संपूर्ण देशभर होळीचा सण साजरा होणार आहे. मात्र, त्याच दिवशी रमजान महिन्यातील शुक्रवार असल्यामुळे मुस्लीम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने नमाज अदा करण्यासाठी बाहेर पडतील. होळीच्या दिवशी हिंदू समुदाय घराबाहेर पडून एकमेकांना रंग लावून सण साजरा करतो. तर, मुस्लिम बांधव जुम्मा नमाजसाठी मशिदींमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या पार्श्वभूमीवर कोणताही वाद किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत.
advertisement
नागरिकांना पोलिसांचा संदेश
मुंबई पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, होळीचा सण आनंदाने आणि जबाबदारीने साजरा करावा. कोणत्याही प्रकारच्या अनुचित कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 12, 2025 9:39 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई पोलिसांची होळी आणि धूलिवंदनासाठी विशेष नियमावली, पालन न करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई