advertisement

MahaShivaratri Mantra: महाशिवरात्रीला मंदिरात बसून करावे श्रीरुद्राष्टकम पठण; भोलेनाथाची कृपा, संकटातून मुक्ती

Last Updated:

MahaShivaratri Mantra: शिवपूजेच्या वेळी आणि विशेषतः महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर रुद्राष्टकमचे पठण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. या दिवशी पूर्ण भक्तीभावाने याचे पठण केल्यास भक्तांचे सर्व कष्ट दूर होतात, मनाला शांती मिळते आणि जीवनात यश मिळवण्याचा आशीर्वाद प्राप्त होतो.

News18
News18
मुंबई : आज सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. महादेवाच्या पूजेसाठी लोक मंदिरांमध्ये जमत आहेत. मंदिरात महादेवाच्या मंत्राचा उच्चार करणं शुभ मानलं जातं. रुद्राष्टकम हे शंभू महादेवाच्या स्तुतीसाठी गायले जाणारे अत्यंत पवित्र आणि प्रभावी स्तोत्र आहे. या स्तोत्राची रचना रामचरितमानसचे रचयिता गोस्वामी तुलसीदास यांनी केली होती. प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवण्यापूर्वी रामेश्वरम येथे शिवलिंगाची स्थापना केली होती आणि अत्यंत श्रद्धेने रुद्राष्टकमचा पाठ केला होता, अशी धार्मिक श्रद्धा आहे. यामुळे रामाला शंकराची विशेष कृपा लाभली आणि युद्धात यश मिळाले.
शिवपूजेच्या वेळी आणि विशेषतः महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर रुद्राष्टकमचे पठण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. या दिवशी पूर्ण भक्तीभावाने याचे पठण केल्यास भक्तांचे सर्व कष्ट दूर होतात, मनाला शांती मिळते आणि जीवनात यश मिळवण्याचा आशीर्वाद प्राप्त होतो.
रुद्राष्टकम स्तोत्र अर्थासह:
नमामीशमीशान निर्वाणरूपं । विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् ॥
निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं । चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् ॥1॥
advertisement
अर्थ: हे ईशाना, मी तुला नमस्कार करतो. तू निर्वाणरूप, सर्वव्यापी, ब्रह्म आणि वेदांचे स्वरूप आहेस. तू स्वतःच्या स्वरूपात स्थित, निर्गुण, निर्विकल्प, इच्छारहित, चेतन आकाशरूप आणि आकाश ज्याचे वस्त्र आहे अशा परमेश्वराची मी आराधना करतो.
निराकारमोंकारमूलं तुरीयं । गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम् ॥
करालं महाकालकालं कृपालं । गुणागारसंसारपारं नतोऽहम् ॥2॥
अर्थ: तू निराकार, ओंकाराचे मूळ आणि तिन्ही गुणांच्या पलीकडे असलेला तुरीय आहेस. तू वाणी, ज्ञान आणि इंद्रियांच्या पलीकडचा, कैलासपती आणि ईश आहेस. भयानक काळचाही काळ असलेला, दयाळू आणि गुणांचे धाम असलेल्या तसेच संसाररूपी सागराच्या पलीकडे नेणाऱ्या तुला मी वंदन करतो.
advertisement
तुषाराद्रिसंकाशगौरं गभीरं । मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् ॥
स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा । लसद्भालबालेन्दु कण्ठे भुजङ्गा ॥3॥
अर्थ: जो हिमालयासारखा शुभ्र गौर आणि गंभीर आहे, ज्याच्या शरीराची शोभा करोडो कामदेवांच्या प्रभेसारखी आहे, ज्याच्या मस्तकावर पवित्र गंगा लहरींच्या रूपात विराजमान आहे, ज्याच्या कपाळावर द्वितीयचा चंद्र शोभतो आणि गळ्यात सर्पांच्या माळा आहेत.
चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालं । प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् ॥
advertisement
मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालं । प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि ॥4॥
अर्थ: ज्याच्या कानात कुंडले डुलत आहेत, ज्याचे डोळे विशाल आणि सुंदर आहेत, ज्याचे मुख प्रसन्न आहे आणि कंठ निळा असून जो अत्यंत दयाळू आहे. जो वाघाचे चामर नेसतो आणि मुंडमाळा धारण करतो, अशा सर्वांचे स्वामी आणि सर्वांचे प्रिय असलेल्या शंकराची मी आराधना करतो.
advertisement
प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशं । अखण्डं अजं भानुकोटिप्रकाशम् ॥
त्रय:शूलनिर्मूलनं शूलपाणिं । भजेऽहं भवानीपतिं भावगम्यम् ॥5॥
अर्थ: जो प्रचंड, श्रेष्ठ, प्रगल्भ आणि परमेश्वर आहे. जो अखंड, अजन्मा आणि करोडो सूर्यांच्या तेजासारखा प्रकाशमान आहे. जो हातामध्ये त्रिशूळ धारण करून त्रिविध तापांचे निर्मूलन करतो, अशा भवानीपती आणि केवळ भक्तीनेच प्राप्त होणाऱ्या शिवाची मी भक्ती करतो.
advertisement
कलातीतकल्याण कल्पान्तकारी । सदा सज्जनानन्ददाता पुरारी ॥
चिदानन्दसंदोह मोहापहारी । प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी ॥6॥
अर्थ: जो कलांच्या पलीकडे, कल्याणाचे रूप आणि कल्पाचा अंत करणारा आहे. जो सज्जनांना सदैव आनंद देणारा आणि त्रिपुरासुराचा वध करणारा आहे. जो सच्चिदानंद आणि मोह नष्ट करणारा आहे, अशा कामदेवाचा शत्रू असलेल्या हे प्रभू, माझ्यावर प्रसन्न व्हा.
advertisement
न यावद् उमानाथपादारविन्दं । भजन्तीह लोके परे वा नराणाम् ॥
न तावत्सुखं शान्ति सन्तापनाशं । प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासम् ॥7॥
अर्थ: जोपर्यंत लोक उमापती महादेवाच्या चरणकमलांची भक्ती करत नाहीत, तोपर्यंत त्यांना या जगात किंवा परलोकात सुख, शांती आणि दुःखाचा नाश प्राप्त होत नाही. म्हणून हे सर्व जीवांच्या हृदयात राहणाऱ्या प्रभू, माझ्यावर प्रसन्न व्हा.
न जानामि योगं जपं नैव पूजां । नतोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यम् ॥
जराजन्मदुःखौघ तातप्यमानं । प्रभो पाहि आपन्नमामीश शम्भो ॥8॥
अर्थ: हे शंभो, मला योग, जप किंवा पूजा काहीही माहीत नाही. मी तर सदैव तुलाच नमस्कार करतो. जन्म, मृत्यू आणि म्हातारपण या दुःखांनी मी तापलो आहे, हे प्रभो, या संकटातून माझे रक्षण कर.
रुद्राष्टकम स्तोत्रम (Shiv Rudrashtakam Path)
नमामीशमीशान निर्वाणरूपं
विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वरूपं।
निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं
चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं।।1।।
निराकारमोंकारमूलं तुरीयं
गिरा ग्यान गोतीतमीशं गिरीशं।
करालं महाकाल कालं कृपालं
गुणागार संसारपारं नतोऽहं।।2।।
तुषाराद्रि संकाश गौरं गभीरं
मनोभूत कोटि प्रभा श्रीशरीरं।
स्फुरन्मौलि कल्लोलिनी चारु गंगा
लसद्भालबालेन्दु कण्ठे भुजंगा।।3।।
चलत्कुंडलं भ्रू सुनेत्रं विशालं
प्रसन्नाननं नीलकंठं दयालं।
मृगाधीशचर्माम्बरं मुंडमालं
प्रियं शंकरं सर्वनाथं भजामि।।4।।
प्रचंडं प्रकृष्टं प्रगल्भं परेशं
अखंडं अजं भानुकोटिप्रकाशं।
त्रयः शूल निर्मूलनं शूलपाणिं
भजेऽहं भवानीपतिं भावगम्यं।।5।।
कलातीत कल्याण कल्पान्तकारी
सदा सज्जनानन्ददाता पुरारी।
चिदानन्द संदोह मोहापहारी
प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी।।6।।
न यावद् उमानाथ पादारविन्दं
भजंतीह लोके परे वा नराणां।
न तावत्सुखं शान्ति सन्तापनाशं
प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासं।।7।।
न जानामि योगं जपं नैव पूजां
नतोऽहं सदा सर्वदा शम्भु तुभ्यं।
जरा जन्म दुःखौघ तातप्यमानं
प्रभो पाहि आपन्नमामीश शम्भो।।8।।
रुद्राष्टकमिदं प्रोक्तं विप्रेण हरतोषये।
ये पठन्ति नरा भक्त्या तेषां शम्भुः प्रसीदति।।9।।
॥ इति श्रीगोस्वामितुलसीदासकृतं श्रीरुद्राष्टकं सम्पूर्णम् ॥
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
MahaShivaratri Mantra: महाशिवरात्रीला मंदिरात बसून करावे श्रीरुद्राष्टकम पठण; भोलेनाथाची कृपा, संकटातून मुक्ती
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement