स्वातंत्र्यदिनाआधी पोलिसांची मोठी कारवाई, पुणे ISIS मॉड्यूलचा दहशतवादी अटकेत
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
एनआयएने यावर 3 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं. या दहशतवाद्यालाही पोलिसांनी 2018 मध्ये चौकशीसाठी ताब्यात घेतले होते पण नंतर सोडून दिलं होतं.
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पुण्यातील आयएसआयएस मॉड्युलचा दहशतवादी रिझवान अलीला अटक केली आहे. एनआयएने यावर 3 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं. या दहशतवाद्यालाही पोलिसांनी 2018 मध्ये चौकशीसाठी ताब्यात घेतले होते पण नंतर सोडून दिलं होतं.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला 15 ऑगस्टपूर्वी मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी ISIS मॉड्यूलच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. रिझवान अली असे या दहशतवाद्याचे नाव आहे. रिझवान हा दिल्लीतील दर्यागंजचा रहिवासी आहे.
ISIS module terrorist identified as Rizwan Ali has been arrested. NIA had declared a bounty of Rs 3 lakh on him. Rizwan is a resident of Daryaganj, Delhi: Special Cell, Delhi Police pic.twitter.com/YkFpHRLK5S
— ANI (@ANI) August 9, 2024
advertisement
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, रिझवान हा पुणे ISIS च्या मॉड्यूलशी संबंधित आहे. अलीच्या अटकेसाठी एनआयएने वॉरंट जारी केले होते. पुणे पोलिसांच्या तावडीतून तो पळून गेल्यापासून तो पकडण्याचे टाळत होता.
दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी त्याला अटक केली. त्याच्याकडून अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. असे म्हटले जाते की, अलीने पुणे ISIS मॉड्यूलच्या इतर सदस्यांसह दिल्ली आणि मुंबईतील अनेक हाय-प्रोफाइल लक्ष्यांचा शोध घेतला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 09, 2024 10:46 AM IST